कृष्णाच्या गाठीला हिडींबा

परवा शुभांगी या रसिक मैत्रिणीची माझ्या –

कृष्ण सावळा होईन मी

या प्रेमविषयक कवितेवर प्रतिक्रिया मिळाली. तिच्या प्रतिक्रियेत ती म्हणते –

khup chan ahe manal sparshun gela.

तुझ्याचसाठी एकदा पुन्हा

जन्म येथला घेईन मी

तुझ्या दुखाच्या प्याल्यामधला

थेंब सुखाचा होईन मी

या ओळी तिनं तिच्या प्रतिक्रियेत अधोरेखित करून  या ओळींची तिनं जाणीवपूर्वक दखल घेतली.तिला दिलेल्या उत्तरात मी म्हणलंय –

शुभांगी, प्रतिक्रियेबद्दल. खूप खूप आभारी आहे. रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगिन. आजकाल राधेसारखी राधा आणि कृष्णासारखा कृष्ण मिळणं फार फार दुरापास्त झालाय.

वस्तुस्थिती मला नाही सांगता यायची. किंवा राधेसारखी राधा आणि कृष्णासारखा कृष्ण या कुलीयुगात असतच नाही असंही मला म्हणायचा नाही. होत काय असावं राधेच्या पदरी कंस पडत असावं आणि कृष्णाच्या गाठीला हिडींबा पडत असावी. आणि मग आपल्याला वाटत असावं, ” छे !!! खरच प्रेमात काही अर्थ नाही.”

पण, माझ्या –

प्रेमाहुनी जगी या

या पोस्टमध्ये तर मी ” प्रेमाहुनी जगी या नसते सुरेख काही, हे सार अमृताचे याच्यात विष नाही. ” असं अगदी ठामपणे सांगितलाय. आणि माझा माझ्या या विधानावर ठाम विश्वास आहे. –

माझी –

मोर आणि लांडोर

हि चारोळी सर्वात अधिक वेळा वाचली गेली. जवळ जवळ १५ शे वेळा. या ओळी  लिहिल्या तेव्हा त्या रसिकांच्या एवढ्या पसंतीस उतरतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या सगळ्याच प्रेमकवितांना रसिक वाचकांनी नेहमीच उचलून धरलं. आणि मला कळून चुकलं कि प्रेम हाच खरा माणसाच्या जगण्याचा आधार आहे. खरंतर याची मला आधीपासूनच जाणीव आहे. नुसती जाणीवच नव्हे तर तशी माझी धारणा आहे. म्हणूनच माझ्या ब्लॉगच्या शिर्षकाखाली मी म्हणलंय –

इथं तुम्हाला मिळतील प्रेम कविता, चारोळ्या, तुम्ही यापूर्वी कधीच न ऐकलेली गाणी आणखी खूप काही….. खास तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी.

यातलं –

खास तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी.

हे अधिक महत्वाचं. कारण त्या दोघांभोवतीच फिरतो आहे या जगाचा आस.

हे सारं लिहिण्या मागे हेतू आहे तो एवढाच कि तरुणांच्या मनातील प्रेम भावनेला अधिक सजग रूप यावं. पण त्यासाठी माझ्या रसिक मित्रांकडून अपेक्षा आहे ती एवढीच कि हा ब्लॉग अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहचवायला त्यांनी मदत करावी.  

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s