हळवं कोण ? चिमणा कि चिमणी

माझीच एक कविता मला आठवतेय. त्यातल्या काही ओळी इथं संदर्भासाठी देतोय. संपूर्ण कविता नंतर कधीतरी पोस्ट करीन –

” मोडून घरटे चिमणी गेली, चिमण्याच्या तव गालावरती
  गालावरती आसवे आली, मोडून घरटे चिमणी गेली.”

आज का कुणास ठावूक या ओळी आठवल्या आणि प्रश्न पडला. अधिक हळवं कोण ?

अधिक हळवं कोण ? असं जर अनेक चिमणे अनेक चिमण्यांना एकत्रितपणे विचारलं तर सगळ्या चिमण्या एकत्रितपणे चिवचीवाट करत म्हणतील, ” आम्हीच अधिक हळव्या.” आणि चिमण्यांच्या चिवचिवाटात आपला गोंगाट कोणीच ऐकून घेणार नाही याची जाणीव असल्यामुळे चिमणे बिचारे गप्पं बसतील.

मला जेष्ठ व्यंग चित्रकार मंगेश तेंडुलकरांच एक व्यंगचित्र आठवतय. एका झाडावर पिलांना भरवणारी चिमणी तर बाजूच्या फांदीवर ऐटीत सिगारेट ओढत बसलेला चिमणा. समाजाचं एक वास्तव चित्रण. यातला व्यंग बाजूला ठेवलं तरी खरच समाजातली वस्तुस्थिती काहीशी अशीच आहे. पुरुषपेक्षा स्त्री अधिक कर्तव्यदक्ष तर पुरुष कर्तव्यकठोर. आणि पुरुषाची कर्तव्य दक्षता पाहीची असेल तर माझी –

‘ फादर्स डे ‘ आणि माझा बाप

हि पोस्ट जरूर पहावी.

पण कोण कर्तव्यदक्ष आणि कोण कर्तव्यकठोर हा मुद्दाच नाही माझा. मुद्दा आहे तो स्त्री आणि पुरुष यात हळवं कोण ?

वरवर पाहिलं तर असं दिसत कि, स्त्रीच्या डोळ्यात लगेच पाणी येत………….तर पुरुष नेहमीच निराकार असल्याचं दाखवतो, स्त्रीला खूप दुबळं मानलं जातं………….तर पुरुषाला कणखर, स्त्री बंधनांची जाणीव असणारी…………तर पुरुष सारीच बंधन झुगारु पहाणारा, स्त्री कोमल…………तर पुरुष , स्त्री नाजूक वेल ……….तर पुरुष खंबीर वृक्ष.

पण खरंच असं असतं. मी माझं मत मांडतोय. कदाचित चुकीचंही असेल.

मला वाटतं स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक हळवा. स्त्री अधिक धोरणी व्यवहारी…..धोरणी……कालानारूप वागणारी…….परिस्थितीला सहज शरण न जाणारी…….खरंच वेलीसारखी वादळ आला तर वाकणारी………वारं आलं तर वाऱ्यावर झुळझुळ्णारी.  पुरुष मात्र वादळ आलं तर मोडून पडणारा……..हवेच्या स्पर्शानं मुळीच न हुळहुळणारा.

पण स्त्रीपेक्षा पुरुष अधिक हळवा असतो……….सुखानं वेडापिसा होतो……..दुःखानं खचून जातो. फक्त त्याचं खचण कुणाला दिसत नाही……आणि त्याच्या जिवाभावाच्या माणसाशिवाय ते तो कुणालाही दाखवू इच्छित नाही. आणि त्याच्या जीवाभावाचं माणूसच जेव्हा त्याची वेदना जाणून घेवू इच्छित नाही तेव्हा मात्र तो खचतो………..मोडून पडतो. मनातल्या मनात फक्त आक्रोशत रहातो.    

Advertisements

4 Comments

    • स्त्रीचा मोठेपणा मी नाकारत नाही पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला स्वीकारत नाही हि फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मग ती सवत असो, सासू असो, नणंद असो कि मैत्रीण असो. अगं वेळ आली तर आई आणि मुलगीही एकमेकींना सांभाळून घेत नाहीत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s