किराणा

आमच्या सोसायटीतल्या सुमाताई. त्यांच्या यमीच लग्नं जमलं. घराघरातून रोज केळवनाची आमंत्रणं येऊ लागली. आज कुणाकडे तर गुजर काकूंकडे, उद्या कुणाकडे तर लिगाडे काकूंकडे, परवा कुणाकडे तर शहाणे काकूंकडे. रोज केळवण झडायची.

कधी कधी तर संध्याकाळच्या चहा आणि नाष्ट्यावरही केळवण भागवल जायचं. बेतही मोठे साग्रसंगीत असायचे. काल असाच तिसऱ्या मजल्यावरच्या जोशी काकूंकडे संध्याकाळच्या केळवनाचा बेत होता. सातची वेळ ठरलेली. आया बाया जमलेल्या. म्हणायला नाष्टा पण निम्मं अर्ध जेवण होईल असा चमचमीत बेत. पाव भाजीचा.

रमत गमत, हसत खिदळत पाव भाजीचा फडशा पडत होता. गप्पा चांगल्याच रंगलेल्या. घड्याळाचं भान कुणालाच नाही. आणि यमीचं लक्ष घड्याळाकडे गेलं. ती किंचाळलीच, ” काकू, आहो साडे आठ वाजलेत. मला देशमुख काकिंच्यात जायचय केळवनाला.”

जोशी काकूंचा शरू आतल्या खोलीतच होता. त्यानं हे ऐकलं आणि बाहेर येत म्हणाला, ” यावर आणखी रात्रीचं जेवण का ?”

” हो ना रे. गेली पंधरा दिवस असच चाललंय बघ.” यमी अभिमानानं फुलून म्हणाली.

” हो का ? मग या महिन्यात किराणा भरलाच नसेल तुमच्या.”

शरूच्या या कोटीवर बायकांच्यात चांगलीच खसखस पिकली आणि यमी देशमुख काकूंच्या घराच्या दिशेने धूम पळाली.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s