हे सार अमृताचे

स्टार प्रवाहवर नवी सिरीयल आलीय. ” स्वप्नांच्या पलीकडले.”

त्या सिरियलची जाहिरात जोरात चालू होती तेव्हाची गोष्ट.  ती म्हणते, ” माझ्या बाबांना ना, मक्याचं कणीस फार आवडतं. ते ना त्या कणसंवाल्याला त्याच्या गाडीसकट विकत घेतील आणि बंगल्याच्या आवारात नेऊन उभं करतील.”

तो म्हणतो, ” ती उंच इमारत दिसतेय ना. असं वाटतं, त्या इमारतीवर जाऊन उभं रहावं आणि खालून जाणाऱ्या माणसांकडे मुंग्यांसारख पहावं.”

यावर ती म्हणते, ” काय भन्नाट विचार आहेत रे तुझे ! ”

यात विचारांचा कोणता भन्नाटपणा आहे ? हे काही मला कळलं नाही.

दुसऱ्यांच स्वातंत्र्य हुरवून घेऊन, त्यांना विकत घेऊन बंगल्याच्या आवारात उभं करणं काय किंवा उंच इमारतीहून इतरांकड मुंग्यांसारखं पाहणं काय ? दोन्हीतही विचारांची क्षुद्रताच आहे. पण हे असं एकमेकांना धरून बोललं,

तिनं त्याला, ” काय झकास दिसतोयेस तू !!! ” आणि

त्यानं तिला, ” काय स्मार्ट दिसतेस तू !!!” असं म्हणलं कि झालं प्रेम.

ती त्याच्या प्रेमात पडताना त्याचा बँक ब्यालन्स पहाते, तो आपल्याला किती वेळा सिनेमाला नेईल…………..किती वेळा हॉटेलात नेईल……………माझ्या पुढ्यातल किती काम स्वतःच्या शिरावर घेईल याची गणितं मांडते……… तर तो…………ती आपल्या चार मित्रांच्या बायकोपेक्षा देखणी असायला हवी, तिच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना आपला हेवा वाटायला हवं. अलीकडचे प्रियकर तिच्यात परी पहात नाहीत, ते तिच्यात पहातात…….एश, कतरिना……..करीना……………ती किती छान दिसतेय याही पेक्षा ती किती सेक्सी दिसतेय हे.

पण खरंच, प्रेम असं असतं ?

पण आजकाल प्रेमाची संकल्पनाच बदलली आहे. त्याच्याशी मोबाईलवर तासंतास बोलणं, कॉलेज सोडून त्याच्या सोबत फिरणं, दिवे लागले कि घरचे आपली वाट पहात असतील असा विचार मनाला शिऊ न देता दिव्यांच्या प्रकाशात झगमगणाऱ्या एखाद्या पुलाच्या कट्ट्यावर त्याच्यासोबत वेळ काढणं.

आणि तिनं  ? …….. तिनं फक्त सुंदर दिसणं. त्याच्या सोबत बाईकवर फिरणं.

जग फक्त दोघांचं असलं पाहिजे. त्यात कुण्णी कुण्णी नको. असं असेल तरच खरं प्रेम आणि त्यातली मजा.

ईश्वरानंतर या जगात सत्य काही असेल तर ते प्रेम. पण त्यातही कलि शिरलाय. आपले अहंकार, आपले स्वार्थ, आपले लोभ आडवे येतात. आणि मग ज्या प्रेमाशिवाय आयुष्याला काही अर्थच नाही त्या प्रेमावरचा विश्वास उडू लागतो.

पण प्रेम म्हणजे त्याग………..प्रेम म्हणजे दान………प्रेम म्हणजे जगण्याचा आधार हे जेव्हा आपल्याला कळेल त्या दिवशी आपल्याला वाटेल –

प्रेमाहुनी जगी या
नसते सुरेख काही
हे सार अमृताचे
याच्यात विष नाही –

एवढंच सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या पुढील कवितेतून केलाय  –

Advertisements

2 Comments

  1. khup diwsani kavita lihili watat pan chhan ahe tarihi ek ya kaliyugat pream nibhavarare premi ahet ki ani mire sarkha premika sudhda mire ne kuthe apeksa keli ki krushnane tichawar prem karawe ashi pan tine kela ki shewat pryant prem

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s