मृत्यूची दाढ

कुणीतरी देवाला निघालेलं असतं. देव दर्शन घेऊन मोठ्या खुषीत परत निघालेलं असतं…..आणि अपघात घडतो. एका क्षणात सारं काही होत्याचं नव्हतं होत. कुणी आपला आप्त गेल्याचं दुख अंतकरणात घेऊन अखेरचा दर्शन घेण्यासाठी निघालेलं असतो आणि तोच मृत्युच्या कचाट्यात सापडतो. असं का होत ?

तर एखाद्या भीषण अपघातात सगळे मृत्युच्या दाढेत सापडतात तर त्याच अपघात्तात एखादा तळहाता एवढा जीव सुखरूप रहातो.

का होत असं ?

काय म्हणायचं याला ? दैव……..प्रारब्ध……..कर्म ……..नशीब…….आयुष्याची दोरी.

आपण खूपसे तर्क करतो. असं झालं नसतं तर तसं झालं नसतं……… असं केल नसतं तर तसं झालं नसतं. पण काही अर्थ असतो का त्या तर्कांना ?

फुटलेला फुगा आहे तसा करणं……….फुटलेली घागर जोडणं………..तुटलेला पतंग धरणं. अशा सारख्या कितीतरी गोष्टी आपल्या हातात नसतातच मुळी. पण तरीही एखादा मृत्यूला गुंगारा देण्याचा प्रयत्न करतो. तर एखादा आत्महत्येच्या रुपानं मृत्यूला कवटाळू पहातो.

मृत्यू ही सुद्धा अशीच एक घटना. मागतली तरी मिळत नाही………आणि नाकारली तरी टळत नाही. अशीच एक घटना परवा घडली. मी अक्षरशा मृत्युच्या दाढेतून परत आलो.

मी स्वतः मृत्यूला मुळीच घाबरत नाही. त्यानं यावं तर सरळ यावं. पुढून सुरा……… खुपसावा …… भेकडासारखा मागून वार करू नये.

पण तो आपल्याला हवा तसं यायला आपला ताबेदार नाही. तो त्याला हवा तसाच येणार आपल्या नकळत.

कालच्या रविवारी मी गावी गेलो होतो. परतीच्या प्रवासात नेहमीच्या ठिकाणी चहा घेतला. पुन्हा निघालो. बाईकच होती. गाडीचं पुढचं चाक जंप मारत होत. गाडी चालवता चालवता मी एक दोन वेळा वाकून पाहिलं टायरमध्ये हवा ठीक होती. असा चांगला दहा बारा किलोमीटर गेलो असेन. मला वाटलं कदाचित एखाद्या खड्यात आपटल्यामुळे रिम आउट झाली असावी. मी वाकून काही तरी पहातोय हे बायकोच्या लक्षात आलं. ती म्हणाली, ” अहो, काही अडचण असेल तर गाडी थांबवून पहा तरी.”

पण, ” काही नाही ग.” म्हणत मी तिला गप्पं बसवलं.

रांजणगाव क्रॉस केलं. हाय वे ………..गाडी सुसाट ………सत्तर ऐंशीनं चाललेली. आणि पुढचं चाक पंक्चर.

गाडीवर ताबा ठेवायचा खूप प्रयत्न केला. पण कसलं काय !!! काही गोष्टी आपल्या हातात नसतातच हेच खरं. कितीतरी फुट गाडीसह फरफटत गेलो. डावा हात कोपऱ्या जवळ सोलून निघाला, खांद्यावर थोड्या जखमा झाल्या, गुढग्याशी थोडं खरचटलं. पाठीत मात्र चांगलीच उसण……… इतकीच दुखापत.

बरेच सह प्रवासी थांबलेले कुणी पाणी देऊ केलं…..

कुणी म्हणालं, ” कुणी उडवला तुम्हाला ? त्या पुढच्या टेम्पोवाल्यानं का ?”

” नाही, नाही. मला कुणी उडवलेलं नाही. माझंच पुढं चाक पंक्चर झाल्यामुळे गाडी स्लीप झाली. ”

मी उठलो. गाडी उचलली. मागे दीड दोन किलोमीटर पंक्चरचं दुकान. गाडी ढकलत निघालो.
जखम झोंबत होती. पाठीतली आणि छातीतली उसण नीट चालू देत नव्हती. जवळ पास कुठे दवाखाना नाही.

पंक्चरच्या दुकाना समोर गाडी लावली. बाजूलाच हॉटेल. हॉटेल समोरच्या मोकळ्या मैदानात मालक निवांत खुर्ची टाकून बसलेला. त्यानं सगळा प्रसंग ओळखला. पोऱ्याला सांगून पाणी मागवलं…….चहा मागवला.

तोवर पंक्चरवाल्या पोरयान चाक खोललं होत. ट्युबचा ओल्व्ह गेला होता. त्याला म्हणालं, ” पंक्चर चेक कर.” त्यानं हवा भरून चाक पाण्यात बुडवलं. …….पाच सहा ठिकाणाहून बुडबुडे. म्हणालं, ” टायर चेक कर.”

तर टायरमध्ये चांगला अडीच इंची खिळा सापडला. ट्यूब बदलली आणि घरी सुखरूप पोहचलो.

रस्ताभर मनात विचारांचं काहूर.  हे असं कसं घडलं ? गणपतीला मनातल्या मनात का होईना पण आपण नमस्कार केलं नाही म्हणून असं झालं का ?गाडी रस्त्याच्या बाजूला न जाता उजव्या बाजूला गेली असती तर काय झालं असतं ? मागनं येणाऱ्या गाडीनं नक्कीच चक्काचूर केला असतं आपला.
पण या साऱ्यातून असे कसे वाचलो आपण ?  आपली ही कुठली पुण्याई ? हे जीवनदान म्हणजे कोणत्या कर्माच फळ ? कि आपल्या सावित्रीच्या पुण्याईचं हे बळ ?
पण वाचलो. दोन दिवस हात काही करू देत नव्हतं.

रविवारी हे घडलं. सोमवार गेला. मंगळवारी माझे सासरे, मेव्हणा, मेव्हण्या. साडू अशी मंडळी दोन कारमधून मुंबईहून ढालगावला लग्नाला निघालेली. पुण्यात त्यांनी माझ्या बायकोला सोबत घेतलं आणि गेले पुढे. संध्याकाळी बायकोचा फोन, ” अहो आण्णाच्या गाडीला अपघात झाला. गाडीचं खूप नुकसान झालंय पण कुणाला फारसं लागलं नाही. सगळे सुखरूप आहेत.” त्या गाडीत माझे सासू – सासरे, माझा मेव्हणा, त्याची बायको  आणि तीन पिली. पण सगळे सलामत. मनोमन बिरोबाला नमस्कार करत सारे दुसऱ्या दिवशीच्या लग्नात सहभागी झाले.

माझ्या मनात आनंदाचा कल्लोळ आणि त्याच विचारांचं काहूर. ही कुठली पुण्याई ? हे जीवनदान म्हणजे कोणत्या कर्माच फळ ? कि आपल्या सावित्रीच्या पुण्याईचं हे बळ ?

परवा –

खरं नातं

ही पोस्ट लिहिली. काळ पुन्हा शांत राहिलो. आणि आज हे सारं तुमच्या समोर मांडायला बसलो. ही पोस्ट लिहिली. काल, परवा पुन्हा शांत राहिलो. आणि आज हे सारं तुमच्या समोर मांडायला बसलो.

पण हे लिहिताना माझ्यावर केवढा प्रसंग ओढवला होता हे नाही सांगायचं मला तुम्हाला. मला सांगायचं ते एवढंच कि मृत्यू सारख्या आपल्या हाती नसणाऱ्या गोष्टीचा आपण खरच मुळीच विचार करू नये. आपण फक्त आपला कर्म करावा. आपला इथला कार्यभाग संपला असेल तर………..वेळ आली असेल तर मारणारा तो आहेच पण वेळ आली नसेल तर आपल्याला मृत्युच्या दाढेतून बाहेर ओढणारही तोच आहे.

Advertisements

3 Comments

  1. जाम राग येतो दुसऱ्याच्या चुकीने आपल्याला फटका बसला कि….बाईक वर सोलापटत जाणे काय असते ते दोन वेळा अनुभवला आहे. नशीब ते सोलापाटन्यावरच भागले….आता कसा आहे हात?..
    देव करो तुम्हाला लवकर रिकव्हर करो.

  2. tuza lekh wachun mala maza lahanpanicha prasang athwala mi satwit hote . maza gov koknatla tithaly vihiri mahit astil tula mi ekda vihirit padle panyani tudumb bharlelya ani tehi pawsat ani eka mulani mala wachwal . kharach dev tari tyala kon mari he agadi barobar ahe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s