मजूर अड्डा

मला शेतीसाठी माणसं पाहिजे होती म्हणून आज सकाळी मजूर अड्ड्यावर गेलो होतो. वरज्याच्या पुलाखाली बाया-बापड्यांची, पोरासोरांची नुस्ती गर्दी फुललेली. रंगी-बेरंगी……….धोतरापासून

……..पायजम्यापर्यंत,

लमाणी घागऱ्यापासून……..

मराठी चोळण्यापर्यंत.

गरिबीतही सजलेल्या बाया…… पुलाखालीच पोतं टाकून बसलेल्या न्हाव्यासमोर बसून दाढी करणारे बापे. माणसा यायची लागतील तशी माणसा घेऊन जायची.

एकजण आला. ” चला चला, वाढपी…वाढपी येणार का ?”  म्हणाला. एका झटक्यात दहा बारा माणसा घेऊन गेला.

मला अक्षरशा गुरांच्या बाजाराची आठवण झाली. फरक एवढाच तिथ खरेदी विक्री होते. इथं होत नाही.
मजुरी मिळालेली कितीतरी माणसं तिथून गेली पण तरीही तिथली गर्दी कमी होत नव्हती. उलट आणखी वाढतच होती.

मी एक धोतर नेसलेला एक बऱ्यापैकी माणूस पहिला. म्हणालो, ” बाबा इथं शेत मजूर मिळेल का ?”

” इथले मजूर तुम्हाला शेतावर न्यायला नाही परवडायचे.”

” का हो ? ”

” आहो इथं एका एकाला अडीचशे – तीनशे रुपये मजुरी मिळती. तुमच्या सारख्या शेतकऱ्याला कशी परवडायची एवढी मजुरी.”

मी गप्पं बसलो. पण मनात विचार आला या ज्या माणसाला या देशातल्या शेतकर्यांच्या अव्स्थ्येची कहरी जाणीव आहे अशा या माणसाच्या हात या देशाचं अर्थ कारण दिला पाहीजे. पण प्रत्येक जीवाचा पोटाला घालणाऱ्या  आमच्या शेतकऱ्याला ज्याला रोज मजुरी मिळणंही शक्य नाही तो वरज्याच्या पुलाखालचा मजूरही किती किरकोळात धरतो हे पाहिलं आणि गलबलून आलं.

तास दोन तास तिथं होतो. पण जाणवलं ते एवढच. मजुरी शंभरा पासून अडीचशे – तीनशे पर्यंन्त मिळते. पण ती रोज मिळेलच याची शाश्वती नाही. हि माणसं खेडेगावातूनच आलेली. पण आता शहरी वास्तव्याला चटावलेली. मजुरीला निघतानाही शहरी संस्कारातून आलेलं नेटकेपण बायांच्या आणि पोरींच्या अंगभर विसावलेलं. दुपारचे बारा वाजलेले. अजून निम्म्याहून अधिक माणसांना काम मिळालेलं नव्हतं. पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नव्हती. कसा का असेना पण जगायचं एवढंच ठरवलेलं हे जीव. कधी कधी वाटत जगण्याचा एवढा सोस का माणसाला ? आणि जगायचं हि कसं तर शरीराला फारसे कष्ट नकोत. का असं ?

रणरणत्या दुपारी दळण पाखडता पाखडता आजीनं दारामोर्ह टाकलेल्या कण्यांवर तुटून पडलेल्या पाखरांसारखे वाटले मला हे जीव. मिळेल त्या कामाच्या तुकड्यावर तुटून पडणारे. पण एकही जण असा भेटला नाही आणि वाटला हि नाही कि जो म्हणेल, ” चला मी येतो तुमच्या बरोबर. तुमचा मातीचा तुकडा हातात घेतो……आणि घामून गळून सोनं पिकवतो.”

कसं व्हायचं या देशाचं……..या मातीचं.

मी अजूनही कष्टकरयाच्या शोधात.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s