मी सुरी कसा फिरवू ?

जवळ जवळ वर्ष झालं मी ब्लॉग लिहितोय. रसिकांनी पाहिलेल्या पंचवीस हजाराहून अधिक पोस्ट आणि अठराहून अधिक देशांचे माझ्या ब्लॉगवर फडकणारे झेंडे हि गोष्ट माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची आहे. आणि सहाजिकच आहे ते. कारण वर्षभरापुर्वी ब्लॉग कशाशी खातात हे अस्मादिकांना मुळीसुद्धा ज्ञात नव्हतं.

आता मी तुमच्याशी नियमित संवाद साधू शकतो याचा आनंद वाटतो. पण हा संवाद एकतर्फी आहे असं मात्र सारखं वाटत. कारण मी माझं मन कोणताही आडपडदा न ठेवता तुमच्याजवळ मोकळं करतोय पण तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं हे मला नेमकं कळत नाही. एक तर तुमच्या प्रतिक्रिया फारशा मिळत नाहीत आणि

rate this

या ठिकाणी तुम्ही तुमचं मतही नोंदवत नाहीत.

वाचणारेही कवी आणि ऐकणारेही कवी अशी जशी मराठी कविसंमेलनाची स्थिती झालीय तशी आपल्या ब्लॉगिंगच्या व्यासपीठाची होऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे.

मी हा सारा डोलारा उभा केला ते आपलं लेखन रसिकांपर्यंत पोहचवाव, त्याला कुणीतरी त्याला ‘ व्वा ! व्वा !’ म्हणावं यासाठी नाही काही. तर मी माझ्या ‘ पालवी ‘ या संस्थेच्या माध्यमातून वृक्ष रोपणाचं आणि संवर्धनाचं जे काम हाती घेतलंय, त्याला या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळावं असं वाटत होतं म्हणून हि सारी धडपड. अजून ते जमलेलं नाही. कसं जमेल माहित नाही. जमण्यासारख असलं तरी माझ्या एखाद्या ब्लॉगर मित्रानं माझ्या घरी येवून त्याबाबत मार्गदर्शन केल्याशिवाय ते साध्य होईल असं वाट नाही. मागे एकदोन ब्लॉगर मित्रांनी माझ्या घरी येवून तशी प्रत्यक्ष मदत करण्याची तयारीही दाखवली होती. पण त्याची फल निष्पत्ती झाली नाही.

कुणी म्हणेल तुम्ही तुमच्या या सामाजिक कामासाठी समाजातूनच निधी का उभा करत नाही ? मित्रहो इथ आमचं सरकार रोज आमच्या माना कापतंय, तिथं तुमच्या मानेवर मीही सुरी कसा फिरवू ? 

आमचं झाडं लावण्याचा हेतू किती साधा आणि सरळ होता हे मी माझ्या –

मला झाड व्हायचं

या कवितेतून व्यक्त केलीय.

पण त्याच बरोबर . झाडं जशी ऊन सोसून दुसऱ्याला सावली देतात तसंच माणसानं ही दुसऱ्याच दुख घेवून त्याला सुख द्यावं अशी अपेक्षा मी माझ्या –

माणसं अशी का वागत नाहीत ?

या कवितेतून व्यक्त केलीय.
म्हणूनच मित्रांनो, अपेक्षा करतोय तुमच्या मनमोकळ्या प्रतिसादाची आणि मदतीची.

Advertisements

4 Comments

 1. शेंडगे साहेब,
  इतक निराश व्हायचं काहीच कारण नाही अगदी तुम्ही म्हणता त्या प्रमाणे “वाचणारेही कवी आणि ऐकणारेही कवी अशी जशी मराठी कविसंमेलनाची स्थिती झालीय तशी आपल्या ब्लॉगिंगच्या व्यासपीठाची होऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे.”

  अस असलं तरी हि.मुळात माझा असा समज,अंदाज किंवा खात्री म्हणा हवं तर अशी आहे कि जशी तुमची, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे दीड वर्षा पूर्वी अवस्था होती,तीच अवस्था अजून बऱ्याच अंशी,इतर सगळ्यांची आहे.अजून हि, खरे तर आत्ताशी कुठे इंटरनेट हे माध्यम आपल्या कडे निदान मेल ह्या प्रकार साठी तरी थोडे थोडे कुठे वापरायला लागले आहेत.अजून भल्या भल्यांचे साधे मेल अकौंट सुद्धा नसते.त्यांना ते क्रिएट देखील करणे माहित नसते.त्याला काही तरी पैसे लागतात असा हि एक समाज आहे,असतो.अहो ते तर जाऊन द्यात पण धंद्याची अकौंट, कॉम्प्युटर “मध्ये “हमखास नि खात्रीलायकरित्या” करता येतात,ठेवता येतात हे आपल्या सर्वसाधारण व्यापाऱ्यांना आत्ता-आत्ता कुठे पटायला लागलंय.त्या साठी जवळ पास १६-१७ वर्ष जावी लागली,अन तुम्ही मात्र जादूची कांडी फिरावी,फिरली आहे असं मानून चालालाहेत…..हि तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण मुळात ब्लॉग- ब्लॉगिंग नावाचा काही प्रकार असतो हे सुद्धा अजून ९० टक्क्याहून अधिक लोकांना माहीतच नाहीये तर काय ? एकंदरीत ह्या आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात जिथे घरात येणारा पेपर लोकांना वाचायला कि स्वतःच्या मुलाचं प्रगती पुस्तक नीट पहायला वेळ नसतो तिथे ते आपले ब्लॉग अन बिग कधी वाचाणारेत ? शहरातून तुम्ही जी तरुण पिढी पहाता कि जी तुमच्या-आमच्या मते ह्या काळां बरोबर आहे,त्यांची प्रायोरिटी ह्या असल्या गोष्टींना मुळीच नाहीये.ते अजून फेसबुक,ऑर्कुट चॅटिंग मध्येच गर्क आहेत,आणि त्या उपर नेट वर त्या वयाला साजेशी इतर प्रलोभने काय कमी आहेत ? मुळात जीवन शैली तील बदला मुळे तरुण पिढीचे “वाचन” तसे हि आज काल कमीच झाले आहे. फार लांबचे उदाहरण देत नाही पण अगदी माझा स्वतःचा ब्लॉग सुद्धा साधी घराची लोक पाहत नाहीत तिथे मी इतरान कडून काय अपेक्षा ठेवावी ? पण येत्या काही वर्षात आपोआपच जेव्हा सर्वसाधारण सामान्य माणसाला जेव्हा “इंटर नेट” ह्या प्रकार नीटसा माहित होईल तेव्हा नक्कीच फरक पडेल.कारण अगदी आत्ता आत्ता पर्यंत आपल्या मॉनिटरला टी.व्ही.म्हणायचे,समजायचे …खरं कि नाही ? त्या मुळे जरा प्लीज धीर धरा,येईल तुमच्या” त्या” हि प्रयत्नाला एक दिवस नक्की यश येईल.

  • तुमच्या ए मेल पत्त्यावरून तुमच्या नावाची कल्पना आली नाही. मायन्यात काय लिहू कळत नाही. एवढी सविस्तर प्रतिक्रिया कुणी लिहील अशी अशी साधी कल्पना हि मनाला कधी शिवली नव्हती. असो पण मी निराश वैगेरे झालेलो नाही. आपल्या या सगळ्या लिखाणाचा उपयोग या भिकार राजकारण्यांची सत्ता उलथून टाकायला व्हावा असं मात्र मनापासून वाटतं. आपल्या पुढाऱ्यांची जी मनमानी चाललीय ती पहिली कि स्वातंत्र्याची किंमत पिंजरयातल्या पोपटालाच अधिक कळते असं वाटतं.
   पुन्हा एकदा आभार.

   • शेंडगे साहेब,
    मी वर नमूद केल्या प्रमाणेच हा सुद्धा माझा एक अडाणीपणाचा पुरावा आहे… कॉम्प्युटर ज्ञाना विषयीचा….,माझे हे मेल अकौंट हा सुद्धा ,जसे दीड दोन वर्षा पूर्वी आपण ब्लॉग लिखाण सुरु केले तसाच एक अपघात आहे नि हीच माझी आता ओळख बनली आहे त्या मुळे मला mynac ह्या नावाने संबोधायला काहीच हरकत नाही.

  • तुमच्या ए मेल पत्त्यावरून तुमच्या नावाची कल्पना आली नाही. मायन्यात काय लिहू कळत नाही. एवढी सविस्तर प्रतिक्रिया कुणी लिहील अशी साधी कल्पना हि मनाला कधी शिवली नव्हती. असो पण मी निराश वैगेरे झालेलो नाही. आपल्या या सगळ्या लिखाणाचा उपयोग या भिकार राजकारण्यांची सत्ता उलथून टाकायला व्हावा असं मात्र मनापासून वाटतं. आपल्या पुढाऱ्यांची जी मनमानी चाललीय ती पहिली कि स्वातंत्र्याची किंमत पिंजरयातल्या पोपटालाच अधिक कळते असं वाटतं.
   पुन्हा एकदा आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s