भिक मागाविशी वाटतेच कशी ?

परवा १९ तारखेला जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकरांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्तानं त्यांचे बंधू जेष्ठ व्यंग चित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी स्वतःच्या व्यंगचित्रांचं एक दिवसाचं प्रदर्शन पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या  कलादालनात भरवायचं ठरवलं होतं. उदघाटनासाठी अभिनेते अमोल पालेकर येणार होते. आदल्या दिवशी आम्ही प्रदर्शन लावण्यासाठी तिथ गेलो. सगळी चित्र लावता करता रात्रीचे अकरा वाजले. समोरच्या हॉटेल गंधर्व मध्ये आम्ही काही थंड घ्यायचं ठरवलं.

आम्ही हॉटेलातून बाहेर पडलो तेव्हा मी पहिला हॉटेलच्या समोर एक पन्नाशीच्या आसपासची बाई भिक मागत होती. हाडापेरानं मजबूत. अंगावर कपडेही बरे म्हणावेत असे. तिच्या सोबत आणखी एक तरुण स्त्री होती. त्या तरुण स्त्रीच्या कडेवर एक आठ नऊ वर्षाची एक मुलगी. त्यांच्या आसपास वावरणारा एक गृहस्थ. पंचावन्नच्या आसपासचा. सगळेच खाल्ल्यापिल्ल्या घरचे वाटत होते. अंगावरच्या कपड्यावरून ते ग्रामीण भागातले आहेत हे कळत होतं.

सोबतचे सगळे गेल्यानंतर मी एकटाच मुद्दाम पुन्हा हॉटेलसमोर गेलो.  अपेक्षेप्रमाणे ती सगळीच माझ्या भोवती जमा झाली. त्यातली ती पन्नाशीच्या आसपासची बाई अधिक पुढाकार घेत भिक मागू लागली. तो म्हातारा आसपास होताच. मला शेतीसाठी माणसा हवी होती. हि सारीच मंडळी अंगापिंडानं मजबूत असल्यामुळे आणि तशीच ग्रामीण भागातली वाटल्यामुळे. मी संवाद साधायचा प्रयत्न केला.

” गाव कुठलं मावशी तुमचं ? ” मी अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होतो.

” औरंगाबादकडचे हाव बाबा आमी ? ” ती मोठी बाई म्हणली.

” मग इकडं कुठं गेला होता ? ”

” देवाला गेलतोत बाबा. ”

” मग इथ रात्रीच्या या वेळेला भिक कशाला मागताय. ? ”

” येळ असती बाबा एकेक. ”

” चला मावशी माझ्या शेतावर येताय का ? काय कमी पडू देत नाही तुम्हाला. ”

” न्हाय बाबा. आमची बी शेती हाय. तुझ्यासारखा एक पोरगा हाय.”

” किती आहे शेती ? ”

” हाय बाबा सहा एकर. ”

” सहा एकर शेती आहे म्हणताय मग इथ या वेळेला अशी भिक मागताना काही वाटत नाही.” आता माझा आवाज चढला होता.

” म्हणालं ना बाबा येळ असती एकेक.” एवढी भिक मागणारी बाई पण तिच्या आवाजात कुठही काकुळती नव्हती. आर्जव नव्हता. विनवणी नव्हती.

” चांगल्या घरच्या दिसताय आणि कसली वेळ सांगताय. एवढ्या धडधाकट माणसानं भिक मागण्यापेक्षा जीव दिलेला बरा.”

” आमचं जाऊ दे बाबा या पोरीला तरी दे काही.”

” जा मावशी जा. असं भक मागणं शोभत नाही तुम्हाला.”

आत्ता कुठं त्या म्हाताऱ्या माणसानं तोंड उघडला. काढता पाय घेत त्याच्या बायकोकडे वळून तो म्हणाला, ” चल ये बाई, चल. ”

बाबाच्या मागे सुनेसह आणि नातीसह स्वतःला ओढत नेताना बाई बडबडलीच ” काय बाबा, तुला काय पाझर फुताना. ”

मी गाडीला किक मारली आणि घरी निघालो. पोटात भुकेचे कावळे कोकलत होते. पण डोक्यात विचारांचं थैमान माजलं होतं.

कशी या माणसांना भिक मागाविशी वाटते ? आपल्या बायकोला आणि सुनेला अशा रितीने भिक मागताना पाहून त्या माणसाला काहीच का वाटत नसेल ? आपला हातीपायी धडधाकट नवरा आपल्याला खुशाल भिक मागू देतो म्हणून त्या बाईला आपल्या नवऱ्याचा जराही राग येत नसेल का ? कशी निर्ढावलीत एवढी हि माणसं ? ऐतखाऊपणा माणसाला एवढ निर्लज्ज बनवतो. ? 

खरच आपण सगळ्यांनीच दानधर्म या नावाखाली भिक द्यायचं बंद केलं तर हि हातीपायी धडधाकट माणसं आपोआपच कष्टाचा मार्ग पत्करतील.

खरंच होईल कधी असं ?

होय नक्कीच होईल.

आपण भिक घालणं बंद केलं तर.

Advertisements

1 Comment

  1. आपण सगळ्यांनीच दानधर्म या नावाखाली भिक द्यायचं बंद केलं तर हि हातीपायी धडधाकट माणसं आपोआपच कष्टाचा मार्ग पत्करतील.

    एकदम खरं आहे आपलं लिहिणं !
    परगावी जात असता एक मुका तरुण खाणाखुणा करीत पैसे मागत होता. मी त्याला १०/१२ बिस्किटे असलेला माझ्या जवळचा पुडा त्याला देऊ केला, पण त्याने तो खुणेनेच नाकारला आणि पैसेच देण्याची खूण केली. खाऊन पोट भरण्या पेक्षा , ‘ पिऊन ‘ जगण्यात त्याला स्वारस्य असणार!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s