घरात भांडा टिव्हीवर झळका

आजकाल पैसे कमवण्यासाठी कोण कोण काय काय शकली लढवतील काही सांगता येत नाही. एमटिव्ही वरचे कित्येक रियालिटी शो असेच आहेत त्यात काय काय करायला सांगतील याचा काही भरवसा नाही. लोकांनाही काय आपण टिव्हीवर झळकतोय म्हणाल्यावर ते आपले गुढघ्याला बाशिंग बांधून तयार. ‘ माँ एक्सचेंज ‘ ही सिरीयलही अशीच. दोन्ही घरातली आई बदलली जायची. म्हणजे या घरातली आई त्या  घरात आणि त्या घरातली आई या घरात. के साधलं त्या सिरीयलनं कुणास ठावुक ? कोणता संस्कार केला समाजावर काय माहिती. सेन्सॉर आहे काय आमच्या देशात ? असेल तर मग अशा सिरीयल येतात कशा ?

‘ भांडा सौख्यभरे ‘ हि सिरीयलही अशीच. आपल्या घरातलं भांडण चव्हाट्यावर आणणारी. या माध्यमातून आम्ही घराघरातली भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्ही त्यात बऱ्याच अंशी यशस्वी झालो आहोत असा दावा त्या सिरीयलचे निर्माते करतील. पण ज्या घरातल्या माणसाचं आख्खं आयुष्य असं भांडण्यात गेलं त्यांची भांडणं अशी तासाभरात मिटतील ? आणि त्या सिरीयलचे जे काही भाग मी पहिले आहेत त्यात ही मंडळी अशी काही तावातावाने भांडतात कि माणसामाणसातली नाती किती ठिसूळ झाली आहेत हे पाहून वाईट वाटत. या सिरीयल मध्ये बऱ्याचदा आई आणि मुलगी एका बाजूला तर नवरा आणि बायको दुसऱ्या बाजूला असं चित्र असतं.

या सिरीयलच्या एका भागात तर एक मुलगा बायकोसमोर आपल्या आईला, ” मी तुझा मुलगा नाही आणि तू माझी आई नाही. ” असं म्हणताना ऐकलय.

त्यावर आईसुद्धा मुलीची ढाल करत, ” काही हरकत नाही. माझी मुलगीच माझा मुलगा आहे.” असं मोठ्या तावातावानं सांगते.

छे ! काय साधणार ही सिरीतल यातून.

आणि गंमत म्हणजे लोकही फार चवीनं पहातात हा सिरीयल. अगदी आमची बायकोसुद्धा. ती तर त्या सिरीयल मध्ये आमच्या कुटुंबाला प्रवेश कसा मिळेल याचा विचार करतेय.

मी तिला म्हणालो, ” अगं पण आपल्याला इथ घरात नीट कधी भांडता आलं नाही तिथ टिव्हीवर जाऊन काय भांडणार ?”

Advertisements

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s