डोंगराला घूस लागली….

मला आठवतंय लहानपणी ‘ डोंगराला आग लागली पळा पळा पळा…..डोंगराला आग लागली पळा पळा पळा…..’ असं म्हणत आम्ही एक खेळ खेळायचो. ‘ डोंगर पोखरून उंदीर शोधणे ‘ हा वाक्यप्रचारही माझ्या चांगलाच परिचयाचा आहे. ‘ घूस लागणे ‘ हा वाक्यप्रचारही माहित आहे. जिथे कचरा असतो ……घाणीचे साम्राज्य पसरलेले असते तिथे घूस लागते हेही माहित होतं.

पण चक्क सह्याद्रीच्या रांगानाही हि घूस लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तसं झालंय. पुणे शहराच्या वरच्या बाजूने सुरवात झालीय. वेळीच आवरली नाहीतर हि घूस सह्याद्रीच्या रांगा सपाट करत पार तळकोकणात जाऊन पोहचेल आणि मग आम्हा पुणेकरांना आमच्या इमारतींच्या गच्चीवरूनही अरबी समुद्राची फेसाळती आयाळ पहाता येईल.

पण हे नकोय आम्हाला. आम्हाला सह्याद्रीच्या कुशीतली उबच हवी आहे. अरबी समुद्राची फेसाळती आयाळ पहायची आहे पण ती अलिबागच्या अथवा गुहागरच्या बीचवर जाऊनच. आमच्या घराचा बीच झालेला आम्हाला नको आहे. पण पुढारी आणि बांधकाम व्यावसायिक अशी दुहेरी घूस या डोंगरांना लागली आहे ती आम्हाला उघडं पाडणार.

पुण्याच्या परिसरात तर मी गेले सहा सात महिने हे डोंगर पोखरण्याच काम चाललेलं पाहतोय. मध्ये वर्तमान पत्रांनी या विरोधात आवाज उठवला. थोडी सूत्र हलल्यासारखी वाटली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फतवा काढला. चार आठ दिवस काम बंद राहिलं. मग पुन्हा हळू हळू रात्री दिव्यांच्या प्रकाशात काम सुरु झालं. मग भीड चेपली. आता राजरोस दिवसाढवळ्या हि घूस डोंगर पोखरतेय.

मी रोज जाता येता हतबल होवून नुसता पहात राहतो. मुख्यमंत्री झोपलेत का ? वर्तमान पत्रांना काय झालंय ? हे दिसत नाही का कुणालाच ? असे प्रश्न मनातल्या मनात विचारात रहातो.

छे ! कुणाला विचारतोय मी हे प्रश्न ! ज्या देशातली न्याय व्यवस्था सुद्धा विकली जाऊ शकते त्या देशातला मुख्यमंत्री आणि वर्तमान पत्रे तर चिंचुक्यावारी विकली जातील.

मी माझ्याच सावलीवर थुंकतो………छद्मीपणाने हसतो मीच मला……….मी मतदार राजा………….हतबल……..पराभूत बिनकामाचा…………..षंढ !!!!!!!!!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s