असा पाऊस वेडा

परवा पाऊस पडला होता. म्हणलं, ”  चला पावसाला सुरुवात तर वेळेवर झाली.’

तेव्हा मनात आकार घेऊ लागलेल्या –

” जशी तुझी आठवण
        तसा पाऊस अनावर

या ओळी अधिक स्पष्ट होत गेल्या. कागदावर उतरल्या.

काल ऑफिस सुटायला आणि पाऊस यायला एकंच वेळ झाली. ऑफिसच्या बसमध्ये बसलो. खिडकी उघडली तर  भिजेन अशी भीती म्हणून बसच्या बंद खिडकीच्या काचांमधून पाऊस पाहत राहिलो.

मला आठवली माझी लहानपणीची रूपं.

शाळा सुटताना पाऊस पडला तर पुस्तकाचा लगदा घरी घेऊन येणारी………..

गारांचा चोप झेलत टपोऱ्या गारांनी खिसे भरणारी,…………..

पावसाचे थेंब दिसले कि अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर धूम ठोकणारी………….

कागदाची होडी करून कोसळत्या पावसात त्या होडीच्या मागे धावणारी………..

‘ ये रे पावसा, तुला देतो पैसा ‘ असं म्हणत पाखरांनी पंख पसरावेत तसे हात पसरून स्वतः भोवती गिरक्या घेणारी………..

त्या होडीच्या उगाच वाढलोत………मोठे झालोत……….खरंच लहानपण हरवण्या एवढ मोठ्ठ दुखं दुसरं कुठलंच नसावं.

आमच्या ऑफिसपासून पुणे हा जवळ जवळ ३५ ते ४० किलोमीटरचा टप्पा. पण पाऊस अखंड…….. संततधार ………..सगळीकडे. आमच्या नेहमीच्या मार्गानुसार आम्ही नव्या बोगद्याच्या तोंडाशी आलो. आणि थबकलो. एक मेंढरू थबकलं म्हणून दुसरं थबकावं तशी आमच्या पुढं वहानामागं वहानं थांबलेली. आम्ही थांबलोत म्हणून आमच्या मागं आणखी वहानं थांबलेली.

सगळ्यांनीच खिडक्या किलकिल्या करत उघडल्या आणि आम्ही सारे पावसाचं तांडव पाहून अचंबित झालोत.

पहिल्या पावसाचं माझ्या पाहण्यातल एवढ अक्राळ विक्राळ रूप हे पाहिलंच.

प्रवाहात कोणी माणूसच काय एखादं वहान सापडलं तरी ओढून नेईल असं पाणी……फुत्कारत पुढं झेपावणाऱ्या भुजंगासारखा त्याचा वेग. निधड्या छातीच्या माणसाचीही छाती दडपून जावी असं त्याचा रों रों करणारा आवाज. तावडीत सापडलेल्या वेलीचा चोळामोळा करत पुढं जाणाऱ्या वादळासारखं हे भुईला कुस्करून टाकणारं पाण्याचा वादळ. समोर येणाऱ्या कुणाची भीडभाड नं बाळगणार.

पण मला भीती नाही वाटली त्याची. शिरशिरी सुद्धा नाही वाटली. सर्दी खोकल्याचं भय नाही वाटलं. वहानं थांबलीच होती. ती पुन्हा वळवून जुन्या बोगद्यातून जावं लागणार होतं.

मी खाली उतरलो………..पावसात भिजताना……….खूप खूप आतून…………अगदी मनातून……….. पाऊस झालो.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s