मी कुत्र्यावर प्रेम करतो पण ……..

माझा प्रेमावर दृढ विश्वास आहे पण अवती भोवती पाहिलकी हा विश्वास डळमळीत होऊ लागतो. विचार करू लागतो कि असं का होतं ? आणि लक्षात येतं प्रत्येकाची जगण्याची दुर्दम इच्छा…….स्वार्थ……मोह…….अशा कितीतरी गोष्टी आम्हाला इतरांपेक्षा फक्त स्वतःवर प्रेम करायला भाग पडतात.

पण माणसाला जशा भावना असतात तशाच वेदनाही असतात. त्यामुळेच माणसानं स्वतःच्या भावना जपताना दुसऱ्याच्या वेदना जाणून त्याच्यावर प्रेम करावं. खरंतर प्रेम करण्याची भावना माणूस निसर्गापासून शिकला असावा……….निसर्ग अजूनही आपल्यावर भरभरून प्रेम करतो आहे……..

‘ देणाऱ्याचे हात हजारो
दुबळी माझी झोळी ‘

या ओळी तंतोतंत खऱ्या करताना आपल्याला अनंत हातानं देतो आहे. आपण मात्र फाटक्या झोळीचे कितीही मिळालं तरी हात पसरणारे. म्हणूनच मी मागे

माणसं अशी का वागत नाहीत ?

हि पोस्ट लिहिली होती.

मी अनेकांना कुत्र्यावर जीवापाड प्रेम करताना पाहिलं आहे. आज संध्याकाळी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. तेव्हा त्याचा लालू  ( त्याच्या कुत्र्याचं नाव. लालू प्रसाद यादव नव्हे.) त्याच्या तोंडातलं बिस्कीट कसं काढून घेतो हे त्यानं  दाखवलं. ‘ लालू ‘ चे ओठ त्याच्या अगदी ओठांना भिडले होते. पण त्याची माझ्या मित्राला मुळीच किळस वाटत नव्हती. तेव्हा मनात आलं कुत्र्यासारख्या प्राण्यावर एवढं प्रेम करणारा माणूस, माणसावर सुद्धा तेवढंच प्रेम का नाही करू शकत ?

विचार करताना मला त्या प्रश्नाचं सापडलेलं उत्तर असं –

माणूस आपल्या भाकरीसाठी, स्वतःच्या स्वार्थापोटी दुसऱ्याच्या ताटातला घास हिसकावून घेऊ शकतो. नव्हें स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात तो नेहमीच तसं करतो. पण कुत्रा मात्र टाकलेल्या तुकड्यावरतीच समाधान मानतो. तो आपल्या ताटातला घास कधीच हिसाकावणार नाही.

माणसानही कुत्र्यासारखं असंच टाकलेल्या तुकड्यावर जगावं असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण स्वतःच्या चतकोरीसाठी दुसऱ्याची अर्धी भाकरी हिसकावून घेऊ नये एवढ मात्र खरं

Advertisements

1 Comment

  1. mast ekdum …. khare khar ahe ekdum..कुत्र्यासारख्या प्राण्यावर एवढा प्रेम करणारा माणूस माणसावर सुद्धा एवढंच प्रेम का नाही करू शकत ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s