………..आयचा घो

कुणा कुणाच्या आयचा घो म्हणू ???
लोकांच्या………..
मतदारांच्या……….
पुढार्यांच्या………..
लोकशाहीच्या………..
कि आणखी कुणाच्या ????

आमची लोकशाही म्हणजे एक प्रयोग शाळा आहे. हे मंत्री आमच्यावर ऐकक प्रयोग करत रहातात. मागे कुणी एक मंत्री आला आठवी पर्यंत परीक्षा नको असा फतवा काढून गेला. पोर बेफिकीर झाली. आधीच अभ्यास करायची नाहीत. आता तर अभ्यास करायचा कशाला ? असा प्रश्न विचारू लागली.

आता हे नवे शिक्षण मंत्री – दर्डा. दहावीत नापास झालेल्या मुलांनाही अकरावीत प्रवेश मिळेल असं सांगून मोकळे झाले.

वर्तमान पत्रात बातमी – ” नापासांना दिलासा. अकरावीत प्रवेश मिळणार. ”

सगळ्याच नापासांच्या घरी आनंदी आनंद असणार. कुणी कुणी पेढेही वाटले असतील.

मी नापासांना कमी लेखत नाही. पण नापासांना अकरावीत प्रवेश देण्याच्या या धोरणामागे आमच्या हितापेक्षा तमाम पुढार्यांच्या शाळा चालू रहाव्यात हा आमच्या सरकारचा अंतस्थ हेतू आमच्यापैकी कुणाच्या हि ध्यानी येत नाही. नापास पोरांनाही अकरावीत प्रवेश द्यायला यांच्या बापाचं काय जातंय. हे काय प्रेवश देणार……..फी घेणार…….अकरावितून बारावीत ढकलणार………
बारावीत पास व्हा नाही तर नापास. बसा तिच्या मायला बोंबलत. पुढं पाहिजे तर आम्ही बारावीत नापास झालेल्यांना कॉलेजातही प्रवेश देऊ.

कसं व्हायचं आमचं ……………आमच्या पुढच्या पिढीचं……………आणि आमच्या देशाचं कुणास ठाऊक ?

शासनाच्या प्रत्येक धोरणामागे जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताचाच हेतू अधिक असतो. शासन यांचच………शासकीय कर्मचारी यांचेच………शाळा यांच्याच………कॉलेजही यांचीच……….पतपेढ्या यांच्याच……..साखरकारखाने यांचेच………….बाजार समित्या यांच्याच………….सहकारक्षेत्र यांचच……….. ब्यांकाही यांच्याच.
आम्ही फक्त करांच ओझं शासनाच्या दारी नेऊन टाकणारी गाढवं.

शिक्षण कर किती मार्गांनी भरतो आम्ही……
आम्ही नौकरी करतो येणाऱ्या पगारातून शिक्षण कर कापून घेतला जातो………
आम्ही घरपट्टी भरतो त्यात शिक्षण कर आहेच…….
कित्येक ठिकाणी शिक्षण अधिभार या नावाखाली आमचा खिसा रिकामा केलं जातो……..

आणि पदरात पडतं काय ? खाजगी शाळा………भरमसाट फी…….भरमसाठ म्हणजे किती भरमसाट, तर परवा माझा एक मित्र सांगत होता, ” अरे त्या आमक्या आमक्या शाळेत नर्सरीची एका वर्षाची फी किती आहे माहिती आहे ……….. ४६००० रुपये. बस……पोषाख…….
डोनेशन हे वेगळंच. ”

आयला आमच्या वेळी ( म्हणजे पस्तीस – चाळीस वर्षापूर्वी बरं का ! शिवकालीन घटना नाही सांगत काही मी ) डायरेक्ट पहिलीत प्रवेश मिळायचा. आता म्हणजे लहान गट काय ?…..मोठा गट काय ? नर्सरी काय ?………शिकतात काय कुणास ठाऊक ? पण फी मात्र टेचात.

आम्ही काही करू शकत नाही. फक्त पहात रहाणं एवढंच आमच्या हाती. आंदोलन केलं तरी ‘ बाबां ‘ च्या आंदोलनाला चिरडून टाकावं तसं शासन आमचं आंदोलन चिरडून टाकणार. पण आम्ही चिरडून टाकले जाऊत या भितीन आम्हाला गप्पा बसून नाही चालणार.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s