म्हणे विठ्ठल मला

कितीदा मला वाटत काय करायचं जगुन ? माणसांच्या किती तऱ्हा पहिल्या आपण ? प्रत्येकजण स्वार्थाच्या, मोहाच्या जाळ्यात सापडलेला. या माणसांच्या जगात वावरण्यापेक्षा आपण स्वतःला पांडुरंगाच्या चरणी का झोकून देवू नये ? तोच तर आपला पिता. त्याच्या कुशीत स्वतःला झोकून द्यावं……..तहानुला होऊन त्याच्या पुढ्यात दुडदुडावं. माणसं नाही करत एकमेकांवर निख्खळ प्रेम. माणसाला फक्त जगण्याची ओढ. दोन वेळच्या अन्नाची चिंता. सगळी संपत्ती इथच सोडून जावी लागते हे माहित असूनही त्याच संपत्तीची आस. नकोच हि माणसं.

त्यापेक्षा आपण ज्ञानदेवांची पताका खांद्यावर घेऊ. विठ्ठलाच्या पायाशी जाऊ. त्याच्या चरणी लोळण घेऊ. तोच आपला मायबाप. तो लेकुरवाळा. जो जनीला दळण दळू लागला………..जो गोऱ्याला चिखल तुडवू लागला…….जो सावत्याच्या रानातली भाजीपाला झाला तो विठोबा आपली भक्ती पाहून आपल्याला उचलून घेईल. आणि आपण त्याच्या खांद्यावर बसून सारा ब्रम्हांड पाहू.

असा विचार करून मी विठ्लाला मला त्याच्या पायाशी जागा देण्याची विनंती करतो. पण त्याच्या पायाशी जागा मिळते ती पुण्यवंताला. आणि आपण पुण्यवंत कधी ठरतो, तर जेव्हा त्या विधात्यानं जी कर्म करण्यासाठी करण्यासाठी आपल्या रुपानं या भूतलावर जन्म घेतलाय ती कर्म पार पडल्यावर.

सहाजिकच त्यानं नेमून दिलेली कर्म माझ्या हातून अद्याप पूर्ण झाली नाहीत आणि म्हणूनच माझ्या गाठीला पुरेशी पुण्याई जमा झालेली नाही. हेच विठ्ठल मला सांगतोय या कवितेतून –

विठ्ठल, पालखी, पांडुरंग, परमेश्वर

विठ्ठल, पालखी, पांडुरंग

Advertisements