माणसा परास माकडं बरी

( पण यातली चित्रफित पहिली कि आपली आपल्याच लाज वाटेल.)

गेली सांगून ज्ञानेश्वरी, गेली सांगून ज्ञानेश्वरी,
कि माणसा परास मेंढर बरी.

हे स्वर्गीय दादा कोंडकेंचं, ‘ एकटा जीव सदाशिव ‘ या सिनेमातलं गाणं आजही तेवढंच श्रवणीय वाटत. पण गाणी हि करमणुकीचं साधन मानणारे आम्ही रसिक. त्यातून काही बोध घ्यावा असं आम्हाला कधीच वाटत नाही. सर्व प्राणीमात्रांमध्ये आम्ही सर्वात अधिक शक्तिमान……..आम्ही सर्वात अधिक बुद्धिमान म्हणून शेखी मिरवणारे. पण

bird nest, पक्षांची घरटी, घरट, nest

ज्ञानेश्वरांसारख्या ज्ञानदिपालाही माणसापेक्षा मेंढरंचं अधिक सदगुणी वाटली.

आणि आपणही अधिक बरकाईन पाहिलं तर आपल्यालाही पटेल, खरंच आपल्यापेक्षा पशु – पक्षी अधिक बुद्धिमान आहेत. माणसाच्या वास्तूशास्त्राला मान खाली घालायला लावणारं ‘ बयाबाई ‘ चं घरट हे त्याचं फार उत्तम उदाहरण आहे.

विष्ठेपुर्वी मातीत खड्डा खणणार आणि विष्ठेनंतर त्यावर माती लोटणार मांजर आमच्या पेक्षा अधिक सुज्ञ नाही काय ? नाही तर आम्ही आमच्या स्वच्छतेच्या संकल्पना राबवताना मलमूत्र सयुंक्त पाणी नदीनाल्यात विसर्जित करून किती निष्पाप सजीवांचे जीव धोक्यात आणतो.

पावसाळा सुरु झालाय. आता मुबलक पाणी. नाहीतरी आम्हा शहरवासियांना कोणत्याही गोष्टींची चिंता नसतेच मुळी. नळाला पाणी येत असतं आणि आम्ही ते सढळ हातानं वापरत असतो. कारण पाणी पट्टी भारत असतो ना आम्ही. पण ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैले पायपीट करावी लागते याची जाणीवही नसते आम्हाला. आमचं सरकारही असं धोरणी कि शेतीच्या वाट्याचा पाणी उचलणार आणि उद्योगधंद्यांना देणार. कारण पैसे मिळतात ना.

पण यातली चित्रफित पहिली कि आपली आपल्याच लाज वाटेल.

माणसापेक्षा मेंढर बरी असतील तर माणसापेक्षा माकडं किती शहाणी आहेत हे दाखवणारी. आपल्या पूर्वजांचा आपण एवढा तरी गुण घेऊ आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण साधू.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s