डिप्लोमसी : कशाशी खाता ?

( हि पोस्ट वाचणाऱ्या बहुतांश वाचकांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवावी हि विनंती आणि अपेक्षा.)

मी जवळ जवळ गेली बत्तीस वर्ष इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करतोय. ट्रेनी इंजिनिअर पदापासून म्यानेजर या पदापर्यंत पोह्चलोय. या संपूर्ण कालावधीत कामगारांशी वादाचे अनेक प्रसंग आले. त्यासंदर्भात अनेकदा वरिष्ठांसमोर जावं लागलं आणि बऱ्याचदा, ” तुमच्याकडे अजिबात डिप्लोमसी नाही. ” असं ऐकून घ्यावं लागलं.

खरंच काय असते हि डिप्लोमसी. हे अजूनही फारसं कळलेलं नव्हतं म्हणून विविध ठिकाणी बराच शोध घेतला.

ज्वालामुखीवर बसलेलं असतानाही शांत रहाता येणं म्हणजे डिप्लोमसी ?

ज्वालामुखीवर बसलेलं असतानाही शांत रहाता येणं म्हणजे डिप्लोमसी ?

असा बराच शोध घेतल्यानंतर मला डिप्लोमसीच्या दोन व्याख्या मिळाल्या. एक म्हणजे –

The art and practice of conducting negotiations between nations. ( आपल्या राष्ट्राचा इतर राष्ट्रांशी समन्वय घडवून आणण्याची कला आणि हतोटी म्हणजे डिप्लोमसी )

आणि दुसरी व्याख्या अशी –

Skill in handling affairs without arousing hostility. ( affairs म्हणजे लफडं नव्हे. या शब्दाचा मला डिक्शनरीत सापडलेला अर्थ काम, धं

दा अथवा व्यवसाय होय. hostitility म्हणजे वैरभाव. या सार्यांची सांगड घालून जर मराठीत डिप्लोमसीचा अर्थ सांगायचा झाला तर असं म्हणता येईल कि – कोणताही वैरभाव न उद्भवता एखादी घटना हाताळण्याची

हतोटी म्हणजे डिप्लोमसी.)

diplomascy

भारतीय उद्योग क्षेत्रातील वरिष्ठांना अभिप्रेत असलेली डिप्लोमसी. वरिष्ठांच्या मागे डोळे झाकून चालणे.

पण भारतीय उद्योगातल्या बऱ्याच वरिष्ठांना डिप्लोमसीचा हा अर्थ अभिप्रेत नाही. त्यांच्या मते –
‘ तुम्हाला वेळकाळ पाहून माघार घेता यायला हवी. ‘ आणि ‘ वेळकाळ पाहून तुम्हाला तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवता यायला हवा.’

डिप्लोमसीची हि व्याख्या आमच्या रक्तात एवढी भिनलीय कि भारतीय उद्योगात अनेक ठिकाणी तंत्रज्ञ नव्हे ओझी टाकणारी गाढवं आढळून येतात.

कित्येक वरिष्टांना माझे सहकारी माझे कसे लांगुलचालन करतात किंवा मी बोलेल ते कसे कान पाडून ऐकून घेतात किंवा माझं शब्द कसे झेलतात यातच धन्यता वाटते. अनेकदा बढती आणि उच्च पगार हि अशाच वागणुकी नंतर मिळालेली बक्षिसी असते. पण यातून आम्ही आमच्याच विकासाला खीळ घालतो आहोत. आणि हेच आमच्या, आमच्या देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत घातक आहे. पण हे कुणाच्याही सहज पचनी पडणार नाही.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s