काय फरहा ?…. काय तऱ्हा ?

अलिकडे टिव्हीवर रियालिटी शोची फार रेलचेल झालीय. ‘ इंटरटेन्टमेंट के लिये कुछ भी करे गा ‘ , ‘ जस्ट डान्स ‘ असे किती तरी शो तरुणांनी गजबजून गेले आहेत. विजयासाठी तरुण तरुणी जीवाचं रान करताहेत. एकमेकांना चियरअप करताना शिट्ट्या, टाळ्या, कल्ला पहायला मिळतो. पण वाटतं हि सारी मंडळी नेमकं काय साधणार यातून ? टिव्ही च्यानल त्यांचा टिआरपी वाढवताहेत. पण आमचा देश, त्यातला भ्रष्टाचार या सगळ्याला मोडीत काढण्यासाठी आपला हवा असलेला पुढाकार हे विचार कुणाच्याच मनाला शिवत नाहीत. मी, माझं मोठेपण यातच सारे रमलेले.

हृतिक रोशन सोबत नाचायला मिळणार म्हणून पहिल्या कितीतरी फेऱ्या ओलांडून तरुण कालच्या टप्प्यापर्यंत आले. आणि काल ‘ जस्ट डान्स ‘ च्या मंचावर हृतिक रोशन अवतरला. सारे तरुण खूष. उपस्थितांमध्ये हल्ला गुल्ला. हृतिक रंगमंचावर अवतरला. अगदी आदरानं फरह खानला पदस्पर्श केला.

त्यावर फराहनं ” मेरे चरण क्यूँ छुए ? ” असं अगदी फिल्मी स्टाइलमध्ये विचारलं.

तेव्हा हृतिकनं ” फरहा नहीं होती तो आज मै सुपरस्टार, सुपरहीरो, नंबर वन जो भी हूँ , ओ नहीं होता. फरह मेरी गुरु है. ओ है इसीलिये मै हूँ.”  असं सोज्वळ उत्तर दिलं.

यावर ” हृतिक मै तुम्हारी गुरु हूँ ना, तो मुझे गुरु दक्षिणा में क्या दोगे ? हिरे कि अंगुठी या सोने का हार ? ” हे फरहाचं टिपिकल बायकी उत्तर. या बायकांना आयुष्यात सोन्याचांदीपेक्षा अधिक मोलाचं काही वाटतंच नाही का ?

just dance

अशा टिव्ही शोमधून काय साधला जाणार. तरुणपिढीपर्यंत कोणता संदेश जाणार.

हृतिकनं मात्र कोणतंही सौजन्य न सोडता सोबत आणलेली नटराजाची मूर्ती तिला भेट दिली. पुन्हा नमस्कार केला.

यावर दुसरी परीक्षक बाई वैभवी मर्चंट लगेच पुढे सरसावली आणि म्हणाली, ” हृतिक, तुमने फरहा को गुरु दक्षिण दियी, तो मुजे भी दोस्त दक्षिणा देनी पड़ेगी.” ( या बायका एकमेकींशी अशी तुलना करण्यापेक्षा अधिक काही करू शकणार नाहीत. )

आणि मग हृतिकनं तिचा एक दीर्घ घ घ घ घ घ घ घ मुका घेतला. ( इथंच हृतिक कसा घसरला कोण जाणे ! )

झालं इकडे फरहातली बाई संतापली आणि म्हणाली, ” हृतिक उसे किस और मुसे नटराज कि मूर्ती. “

बिचारा हृतिक, दोन बायकांच्या दादल्यासारखी त्याची स्थिती झालेली. काय करणार ? पण आपण दृश्य रुपात जगभर दिसतो आहोत याचं भान ठेवत हृतिकनं फरहाच्या मस्तकाचं चुंबन घेतलं.

बायका एक पुरुष शेअर करू शकत नाही असं म्हणतात. मग या दोघींना कसं चाललं ते ? कि यांचा हि हृतिक हा टाईमपासचा मामला होता ?

पण फरहा फुसफुसलीच, ” हृतिक, उसे गाल पे और मुझे बाल पे.” काय फरहा ?…. काय तऱ्हा ? ( वेगवेगळ्या रियालिटी शो मध्ये ती परीक्षकाचं काम करते. पण प्रत्येक ठिकाणी तिचे नखरे असतातच. फरहा विषयीच लिहायचं झाला तर आणि एक लिहिवावंसं वाटतंय. ते अनेकदा स्पर्धकांना खूप चिल्लर लेखते. खोचक टोमणे मारते. हे बरोबर नाही.)

फार वाईट वाटलं हा सारा प्रसंग पहाताना.

हे सारं घडत असताना उपस्थित स्पर्धक, तरुण, तरुणी हर्षोतिशयानं बेभान झाले होते. हा सगळा प्रसंग जणू त्यांच्या डोळ्यात मावत नव्हता असे त्यांचे डोळे विस्फारलेले होते. पण मला प्रश्न पडला काय दिलं या प्रसंगानं आमच्या तरून पिढीला. इतर ठिकाणी ठीक आहे हो. पण रियालिटी शो मध्ये तरी नको.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s