नागव्यांचा बाजार

मी खूप खूप वर्षापूर्वी लिहिलेली हि चारोळी. चारोळी म्हणजे काय हे हि मला तेव्हा फारसं ठाऊकही   नव्हतं. एकाखाली एक अशा चार ओळी लिहिल्या म्हणजे झाली चारोळी असं एक  माझं मत होतं. आजही बहुतेकजण या एकाच हेतूने आणि विचाराने चारोळी लिहितात. कल्पनांचा फारसा पसारा मांडवा लागत नाही. विषय आणि आशय फारसा तणावा लागत नाही. एकदम इनस्टंट फूड सारखं. एकाखाली एक अशा चार ओळी लिहायच्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधायचं. बस झाली चारोळी.

पण खरचं चारोळी इतकी सोपी नाही. तांदळाच्या दाण्यावर रामायण लिहण्यासारखं आहे चारोळी लिहिणं म्हणजे. खपू मोठा आशय घेऊन येण्याऱ्या मोजक्याच ओळी म्हणजे चारोळी. हि चारोळीची मला भावलेली व्याख्या.

*************************************************************************************************************************************************************************************

अवतीभोवती आपण पाहतो तेव्हा आपल्याला जाणवत हे जग फार फार स्वार्थी आहे. इतकं कि बऱ्याचदा माणसाला आपलं थोडं सुद्धा वाईट झालेलं नको असत. पण  इतरांच चांगलं झालेलही पाहवत नाही. थोडी फार मोजकी माणसं त्याला अपवाद असतातही किवा आहेतच. पण बहुतांश लोक हे असे नागवे असलेले. दुसऱ्याच्या दुखत स्वतःच सुख शोधणारे. कित्येक लोक असे असतात कि त्यांना स्वतःच्या सुखातच रस असतो इतरांचं काही होओ त्यांना काही घेणंदेणं नसतं. काही माणसा इतरांना स्वतःच्या मनाचा कधीही ठाण लागू देत नाहीत. आणि आपल्या मात्र अशाच माणसांवर प्रेम करत रहाण्याशिवाय पर्याय नसतो.

अशी हि वृत्तीनं नागवी असलेली माणसं जेव्हा त्याचं भलं होत नाही तेव्हा दुसऱ्यांचहि भलं होऊ देत नाहीत.

जग असं खूप वाईट असला तरी चांगली माणसही खूप होवून गेली आहेत या जगात. त्यात संत ज्ञानेश्वर, संत गाडगे महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, मदर तेरेसा अशी अनेक नवा घेता येतील.

चांगली माणस जशी होऊन गेली तशी आजही काही चांगली माणसं आहेत. त्यात जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांचा नाव जसा घेता येईल तसं जेष्ठ समाजसेवक आण्णा ह्जारेंचंही नाव घेता येईल. या अशा सदगृहस्थानच्या अंगावर चिखलफेक करणारेही खूप आहेत.

चांगल्या माणसांच्या सहवासात राहून अशा मंडळींना आपण चांगल वागावं असं नाही वाटत. उलट अशी अनेक मंडळी एक होतात आणि चांगल्या माणसाला वाईट ठरवतात. तीन अट्टल दारूबाजांनी चौथ्याला दारू प्यायला फशी पाडाव तसं. अशा वृत्तीच्या लोकांसाठी लिहिलेल्या या ओळी. चारोळी.

मित्रहो जग हे असं आहे. स्वतः नागवं आहे म्हणून अंगभर कपडे असणाऱ्या माणसाला नागवं करणारं. अशा या जगात आपण आपला चांगुलपणा टिकवून धरायला हवा. एवढच सांगायचय मला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s