डेमेंशिया : एक कायदेशीर पळवाट

कलमाडींच्या राष्ट्रकुल घोटाळ्याविषयी आम्ही खूप बोललो. काँग्रेसनही लगेच त्यांना गजाआड ढकलून दिलं. कॉंग्रेसची ही आजकाल परंपराच झालीय. कुणाचंही प्रकरण पक्षाच्या अंगाशी येतंय म्हणलं कि कॉंग्रेस लगेच त्याचा बळी देऊन मोकळा होतो. भ्रष्टाचारच वादळ थोडं शमलं कि पुन्हा त्याच व्यक्तीची प्राणप्रतिष्ठापना करायला पक्ष बाह्या सरसावून पुढे येतो.  विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं पण लगेच त्यांना केंद्रात घेतलंच. मोठ्या दिमाखात अशोकराव मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले पण ‘ आदर्श ‘ घोटाळ्यात आडकले. पृथ्वीराज चव्हाणांनी लगेच ती जागा बळकावली. पण मला प्रश्न पडतो, हा सगळा खेळ महाराष्ट्राशीच का ?
कारण एकमेकांचे पाय ओढण्याच राजकारण महाराष्ट्रातच सर्वाधिक चालतं म्हणून.

पण कलमाडींचा गळा सोडवायचा मंत्र आता टाकला गेलाय. ‘ राष्ट्रकुल घोटाळ्यातून कलमाडी निर्दोष सुटतील. ‘ महिन्याभरापूर्वीच दिग्विजय सिंहांनी असं वक्तव्य केलं होतं. मला तर वाटतं डेमेंशियाची पाळंमुळं तिथच रुजली असावीत. यापुढे कोणताही भ्रष्टाचार डेमेंशियाच्या नावाखाली खपवता येईल. कलमाडी सुटले कि दोन हजारी ‘ ए राजा ‘ सुटण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकेल.

त्यानंतर कोणतेही गुन्हेगार डेमेंशियाचा आधार घेतील. मग काय सगळी आबादीआबाद.

( From Net ) The National Institute of Neurological Disorders and Stroke defines dementia as:
“… [A] word for a group of symptoms caused by disorders that affect the brain. It is not a specific disease. People with dementia may not be able to think well enough to do normal activities, such as getting dressed or eating. They may lose their ability to solve problems or control their emotions. Their personalities may change. They may become agitated or see things that are not there.”

डेमेंशियाची सर्वसाधारण व्याख्या पुढीलप्रमाणे ( वरील व्याख्येचा सैर मराठी अनुवाद.) – 
हा रोग नसून मेंदूवरील नियंत्रण सुटण्याचा प्रकार आहे. यात व्यक्ती तिच्या दैनंदिन कृती करताना नीटसा किंवा सूत्रबद्ध विचार करू शकत नाही. यात जेवण करणे किंवा कपडे घालणे यासारख्या कृतींचाही समावेश होतो. अडचणी सोडवण्याची किंवा भावनांवर नियंत्रण मिळवण्याची क्षमताही ते हरवून बसतात. त्यांच्या व्यक्तीमत्वातही बदल होतो. इतकेच नव्हे तर त्या व्यक्ती विनाकारण उत्तेजित होतात किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांना विनाकारण भास होतो.

कलमाडीच काय यापुढे कोणताही गुन्हेगार या व्याखेतील ‘ यात व्यक्ती तिच्या दैनंदिन कृती करताना नीटसा किंवा सूत्रबद्ध विचार करू शकत नाही. ‘ एवढ्याच विधानाचा आधार घेवून निर्दोष सुटू शकेल.

डेमेंशिया, dementia

डेमेंशिया, dementia

हा रोग सर्वसाधारणपणे जेष्ठ नागरिकांनाच होतो. असंही या आजाराविषयी वाचायला मिळालं. यावर मला म्हणायचं ते एवढच कि, ‘ यापुढे पन्नास पंचावन्न पेक्षा अधिक वयाच्या राजकारण्यांना राजकारणातून बाद कराल का ? ‘ 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s