पाणीसुद्धा पेट घेतं

रॉकेल, डीझेल, पेट्रोल हे ज्वालाग्रही पदार्थ आहेत. लिक्विड पेट्रोलियम ग्यास ( LPG ) सुद्धा पेट घेतो. आणि असा धगधगता निखारा आमच्यापासून काही हातांवर असतो. कापरासारखा घन पदार्थसुद्धा पेट घेतो. असे आणखी कितीतरी पदार्थ सांगता येतील कि जे निर्जीव असूनही पेट घेतात. स्वतः जळताना अवतीभोवती जे काही असेल ते स्वः करतात. अगदी पवनेचं पाणीही पेट घेतं. पण आम्ही सजीव असूनही पेट घेत नाही. एखाद्या वाटेवरच्या दगडासारखे निमुटपणे सारं पहात रहातो.

असो.

पवनेचं पाणी नुसतं पेटलंच नाही तर त्या पाण्यानं सगळ्या मावळला कवेत घेतलं आणि शिवकालानंतर कितीतरी वर्षांनतर पुन्हा शिवाजी महाराजांचा मावळा पेटून उठला. पण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच राजाचं च्त्राटती संभाजी महाराजांचं शीर औरंगजेबाला पेश करणारे मानाजी मानेसारखे कटकारंस्थानी आमच्यात काय कमी आहेत ? आणि हे मानाजी माने वेगळे असत नाहीत. ते आमच्यातच असतात. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमचा जीव घेतात. नाव जनकल्याणाचं पण साधायचा असतो स्वतःचा स्वार्थ. आर. आर. काय, अजित पवार काय. हे केवळ शेतकर्यांच्या मना मोडायला बसले आहेत. कारण यांना जाणीव नाही कि यांच्या मुखात पडणारा घास गावाकडच्या मातीतून येतो आणि त्यात शेतकर्यांचा घाम मिसळलेला असतो.

Advertisements

1 Comment

  1. पण आम्ही सजीव असूनही पेट घेत नाही. एखाद्या वाटेवरच्या दगडासारखे निमुटपणे सारं पहात रहातो….

    मनगटात ताकद व छातीत आग नाही म्हणून नाही काही. मन मेलीत सगळ्यांची. मुर्दाड ! कारण पेटवणारे मानेसारखे लोक केवळ स्वत:चा स्वार्थ आपल्या जळीतावर साधणार आहेत याची पक्की खात्री आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s