पाचशे पंचावन्न रुपयाची सिगारेट

सिगारेट, धुम्रपान,

सिगारेट, धुम्रपान,

हे असं आमच्या देशातच घडू शकतं. कारण काही जण खोऱ्यानं ओढतात. तर काही जन जात्यात भरडल्यासारखे भरडले जाता. ज्याच्या कडे पैसा येतो त्याला पैशाची किंमत नसते. आणि कित्येक जण असे असतात कि ते पै पैला उधार असतात.

झालं असं परवा माझा एक मित्र थायलंडला गेला होता. त्याच्यासोबत मुंबईतला एक रईस आदमी होता. जबरदस्त स्मोकर. मी ऐकून हादरलोच. त्याला २० पाकिट लागतात दररोज. आमच्या मित्रांनं त्याला सल्ला द्यायचा प्रयत्न केलाच. ” ओ सिगारेटसे दमा, कॅन्सर, ……….”

त्याचं वाक्य त्यानं पुरं सुद्धा होऊ दिलं नाही. तो म्हणाला, ” मालूम है….मालूम है सब. लेकीन मै सिगारेट नाही पिउंगा तो मै भाग नाही पाउंगा.”

ते मुंबईच्या एअर पोर्टवर पोहचले. त्या गृहस्थाला सिगारेट पिण्याची हुक्की आली. आमच्या सरकारनं सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई घातलेली. एसटिच्या थांब्यावर चालतंय विमानतळावर कसं चालणार ? पण महाराज पुरते सरावातले. ‘ घुंस कहा चालती है ‘ हे पुरेपूर जाणारे. ज्या देशातली न्यायव्यवस्थाही विकत घेता येते त्या देशातल्या विमानतळावरचा छोटासा कोपरा म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट. त्या महाराजांनी विमानतळावरच्या कर्मचाऱ्याला गाठलं. आपली अडचण सांगितली. त्यांची अडचण आणि त्यावरचं सोल्युशन हे नेहमीचंच असणार. त्या कर्मचाऱ्याला आपली अडचण सांगताना हे महाराज पाचशे रुपयाची नोट त्या कर्मचाऱ्याच्या हातात सरकवायला विसरले नाहीत.

कळला ना माझा हिशेब. ‘ चारयाण्याची कोंबडी……बारा आण्याचा मसाला ‘ ही म्हणही फिकी पडावी असा हा किस्सा.

काय म्हणायचं याला.

यातून दोन गोष्टी अधोरेखित होतात –

सिगारेट, धुम्रपान

सिगारेट, धुम्रपान

पहिली, माणूस व्यसनाच्या किती अधीन जाऊ शकतो आणि

दुसरी आमच्या देशातला भ्रष्टाचार किती

तळागाळापर्यंत पोहचलाय. मुंबईत बॉम्बस्फोट व्हायला ही आमची व्यवस्थाच कारणीभूत असणार आणखी काय !

‘ शासनाचा कायदा  आणि सरकारी नौकरशाहीचा फायदा ‘ हे आमच्या देशात चालूच रहाणार. आणि त्यातूनच फोफावणारा भ्रष्टाचार आमचा देश गिळून टाकणार.

Advertisements