अण्णा सैन्यातून पळाले होते !!!!!!!

आज अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस. संपूर्ण देशभर स्वातंत्र्यलढा सुरु असल्यासारखं एक स्फूर्तीदायक वातावरण………. आणि डोळ्यावरती झापडं ओढून बसलेलं आमचं सरकार. सरकार तरी का म्हणावं याला. हे तर साल मासे टिपण्यासाठी प्रवाहात ध्यानस्त बसलेले बगळे.

रामदेवबाबांना यांनी भर मैदानातून हुसकावून लावलं. रामदेवबाबांचा बर फुसकाच निघाला. आपल्या गल्लीत कुत्र्यालाही स्फुरण चढतं तसं दिग्विजय सिंग, प्रणव मुखर्जी यांना स्फुरण चढलं. ‘ अण्णांचाही रामदेवबाबा करू ‘ असं म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली. पण गेली पाच दिवस देशभर अखंड पेटलेला वणवा पहिला आणि हळू हळू या काँग्रेसजनांची भांग उतरू लागली.

पण आपल्यातली किड झाकताना दुसऱ्यांच्या अंगावर चिखल उडवणं नाही ती राजनीतीच नव्हे. सहाजिकच या भिकार राजकारण्यांनी काल ‘ अण्णा सैन्यातून फरार झाले होते ‘ असा आरोप केला. पण अण्णांनीच मिळवून दिलेल्या माहितीच्या अधिकारातून हा आरोप निलाखस खोटा असल्याचं संरक्षण खात्यानं सांगितलं आणि कॉंग्रेस अण्णांना चेकमेट करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न फसला. गेली पाच सहा दिवस आंदोलनाचा जोर आणि जनतेचा सहभाग मुळीच ओसरला नाही.

सहाजिकच आज सरकारनं थोडसं नमतं घेतल्याचं दिसतंय. पण बाजी उल्तेय असं पाहिल्यानंतर हे एखादं पाऊल मागे घेण्याचं राजकारणही यामागे असू शकेल. जिंकलोत तरी भरून पावलोत असं नव्हे. ही तर लढ्याची सुरवात आहे. मला राम मंदिराच्या लढ्याच्या वेळची एक घोषणा आठवतेय –
” ये तो सिर्फ एक झांकी है….मथुरा काशी अभी बाकी है.”

Advertisements