कसाबसुद्धा बरा

आज अण्णांच्या उपोषणाचा दहावा दिवस. पण अजून आमच्या शासनाला पाझर फुटत नाही. एकटे अण्णाच नव्हे आज देशातले लाखो तरुण आणि नागरिक गेली दहा दिवस आंदोलनात सहभागी झालेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून निषेध नोंदवला जातोय. पण आमचं सरकार मुग गिळून गप्पं बसलंय.

कसाबनं जे काही केलं ते त्याच्या देशासाठी आमच्या देशात येऊन केलं. पण आमच्या देशातले पुढारी आमच्याच देशासाठी काही करत नाहीत. तेही देशभर वणवा पेटलेला असताना. म्हणून मी म्हणतोय – कसाबसुद्धा बरा.

आमचे राजकारणी एवढे पोहचलेले असताना ते लोकपाल विधेयकाला इतके का घाबरताहेत हे कळत नाही. इतकाच कशाला अनेक निरपराध जीवांचे बळी घेणाऱ्या कसाबला, अफजल गुरूला जी न्याय व्यवस्था अजून फाशी देऊ शकत नाही ती न्याय व्यवस्था भ्रष्टाचारात सापडल्याचा काय वाकडा करू शकणार आहे. होईल ते येवढच कि एखाद्या सजग नागरिकांना तक्रार केल्यानंतर कमीत कमी भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर शिंतोडे तरी उडतील. पण भ्रष्टाचार करणाऱ्या आमच्या पुढार्यांना स्वतःच्या अंगावर तेवढा शिंतोडाही उडवून घ्यायचा नाही.

शिवाय ज्या देशातली न्याय व्यवस्थाही मोडीत काढता येते त्या देशात जनलोकपाल विधेयक येऊनही भ्रष्टाचार संपुष्टात येईल असं नाही. कारण जनलोकपाल समितीवर पुन्हा स्वतःचा स्वार्थ साधू पहाणारी मंडळीच असतील. ती पुन्हा विकली जातील. पण कमीत कमी भ्रष्टाचारानं बरबटलेल्या या व्यवस्थेवर एक अंकुश तरी येईल. पण आमच्या शासकीय व्यवस्थेला तोच नको आहे. सापच मागे नसला तर पळायची काही गरजच पडणार नाही ना. एवढाच त्यांचा विचार. म्हणून सगळा विरोध.

पण नक्कीच लोकपाल विधेयकात बरीच ताकद आहे. म्हणून तर तमाम पुढाऱ्यांचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा या विधेयकाला विरोध आहे. पण अण्णा मागे हटणार नाहीत असं मला विश्वास आहे. गरज पडलीच तर आंदोलन अधिक तीव्र करू पण लोकपाल विधेयक आणूच.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s