ढाण्या वाघ आणि आण्णांचं उपोषण

खरा भारतीय, indian,

खरा भारतीय, indian,

मुंबापुरीत मच्छर फार झालेत. म्हणून हे मच्छराचं गुणगुणनं आहे असं समजून आमच्या ढाण्या वाघानं आपला पंजा आपल्याच कानाच्या दिशेनं फिरवला. पण मच्छराचा मागमूसही हाती न लागता जेव्हा त्यांच्याच पंजाचा त्यांच्याच कानाखाली जाळ निघाला तेव्हा ते समजून चुकले कि नाही हे मच्छराचं गुणगुणनं नाही, ही सिंहाची गर्जना होती.

मग डोळ्यावरची झापड बाजूला सारून डोळे किलकिले करत आज कितीतरी दिवसानंतर आमच्या ढाण्या वाघानं आजूबाजूला पाहिलं. पण आपल्याच शिनीच्या ( म्हणजे बरोबरीच्या. आठ दहा वर्ष मागं पुढं असली तरी एका शिनिचीच म्हणत्यात नव्हं ) वाघानं एवढी सगळा देश हादरवून टाकणारी गर्जना केली म्हणाल्यावर हा आमचा एवढे दिवस सुस्तावलेला वाघ एकदम खजील झाला. पण त्याच्या तोंडातून काही डरकाळी फुटेना.
पण उशिरा का होईना काल कसातरी आमच्या वाघानं जबडा उघडला. डरकाळी फोडली. पण डरकाळी नव्हतीच ती. संतापही नव्हता. कंटाळून जांभळी ( जांभई ) दिल्यासारखं वाटलं. काय म्हणाला काल आमचा ढाण्या वाघ माहिते आहे. आमचा म्हणतोय म्हणजे मी सेनेचा नाही बरं का. पटलं नाही हे आमच्या ढाण्या वाघाचा विधान. काय म्हणाला माहिती आहे तो ? तो म्हणाला – ” मला अण्णांच्या प्रकृतीची काळजी वाटते. अण्णांनी उपोषण मागे घ्यावं. हवं असेल तर अरविंद केजरीवाल अथवा किरण बेदी यांनी उपोषणाला बसावं.”

व्वा वाघा तुझ्या नसानसातून हिंदुत्वाच आणि मराठी मातीचं वारं वाहत आहे हे आज पटलं. अण्णांशिवाय कुणी उत्तरेकडचं अथवा दक्षिणेकडचं असं उपोषणाला बसला असतं तर तू त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं. केवळ आपले अण्णा आहेत म्हणून तुझ्या नसानसातलं शांत झालेलं हिंदुत्वाच वादळ आज पुन्हा जागं झालं. पण ते वादळ इतका पोरकटपणा करेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

मागे एकदा त्या पवारांच्या अज्यानं तुझ्या क्रत्त्वा विशी सवाल उपस्थित केलं होता तेव्हा आम्ही त्याचा कोण समाचार घेतला होता. पण आज अण्णांच्या कर्तुत्वाला पाठबळ देण्याऐवजी तुम्ही त्यात भुंगा सोडायचा जो प्रयत्न केलाय तो अजिबात नाही आवडला आपल्याला. अहो अर्विडचा आणि किरणचा नाव घेण्या ऐवजी एखदा म्हणाला असता, ” अण्णा तू लढायचं तर तू लढ. पण उपोषण सोड. आणि उपोषण चालू ठेवायचाच असेल तर त्या अर्विडला आणि त्या किरणला नको नको बसवू उपोषणाला. फक्कड बोलतोय तो अरविद. उपोषणासाठी जर कुणी गडीच पाहिजे असल तर मी माझा बछडा देतो ना पाठवून. पण तू उपोषण सोड.”

Advertisements