वेसण घातलेला बैल आणि …….

आज टिम अण्णाचे प्रशांत भूषण यांनी मुलायम सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात चार कोटी मागितल्याची बातमी वाचली. आणि वाईट वाटलं. या पुढार्यांनी आजतागायत एकमेकांचे पाय ओढण्याशिवाय आणि या देशाला अस्थिर करण्याशिवाय आणखी काही केलं नाही. रामदेव बाबांचं आंदोलन मोडून काढलं. अण्णांनाही दुसऱ्याच दिवशी अटक करून तुरुंगात टाकलं. पण हि मात्रा चालली नाही तेव्हा पडती बाजू घेतली. अण्णांचं उपोषण चालू दिलं. दरम्यान टिम अण्णांमध्ये मतभेद पसरवण्याचे प्रयत्न केले. पण अखेरच्या दिवशी सारी सूत्रं अरविद केजरीवालांच्या हाती पाहून बरं वाटलं.

आता हि नवीन बातमी प्रशांत भूषण यांनी मुलायम सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात चार कोटी मागितल्याची. ही सीडीच यांच्याकडे आहे म्हणे. किती वेळाची आहे त्याचा मात्र कुठेही उल्लेख नाही. संभाषणाची चार सहा वाक्ये सुद्धा वर्तमान पत्रात छापून आलेली. त्यात मुलायम सिंग नुसते हुं हुं करताहेत. आणि प्रशांत भूषण चार कोटी मागताहेत. अरे मी सुद्धा अशा वेळी अशी चूक करणार नाही. आणि अण्णांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रशांत भूषण असं करतील ? यांच्यावर येवढा विश्वास टाकावा या लायकीचे आहेत हे पुढारी ?

रामदेव बाबांच्या मागे त्या बयेला राखी सावंतला लावायचा चावटपणाही कॉग्रेसच करू शकतं. नाहीतर वाट्टेल त्या थराला जाणारी राखी सावंत तमाम चिकणे चोपडे, धनिक सोडून रामदेव बाबांच्या प्रेमात कशाला पडेल ?  आणि प्रशांत भूषण यांच्या मागे हे. कोणी आणि किती विश्वास ठेवावा या गोष्टीवर. अभिनेत्यांचे आवाज काढणारे कितीतरी मिमिक्री कलाकार आपण गल्लीबोळात पहातो. एखाद्याचा हुबेहूब आवाज काढणं काही फारसं अवघड नाही. मनीष तिवारींनी तर चक्क अण्णाच डोक्यापासून पायापर्यंत भ्रष्टाचारी असल्याचा विधान केलं होतं. हे काय काही बोलीतील. यांच्या जिभेला कोण लगाम घालणार ?

नेत्यांच्या सभांना माणसं गोळा केली जातात. मी परवा पाहिलेल्या सुप्रिया सुळेंच्या स्त्री भरून हत्ये संदर्भात काढलेल्या पदयात्रेल्या मुलीही अशाच कुठल्या कुठल्या शाळा कॉलेजातून आणलेल्या. आणि तमाम सत्ताधाऱ्यांना हेच सहन झालं नाही. अण्णांसारख्या एका सामान्य, कफल्लक समाजसेवकाच्या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळतो म्हणजे काय ? पण  अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा मिळाला तो काही अण्णांची जनमानसातली प्रतिमा म्हणून नाही काही.  अण्णांनी भ्रष्टाचाराच्या ज्या व्यवस्थेविरोधात आंदोलन सुरु केलं त्या व्यवस्थेला देशातला प्रत्येक नागरिक बळी पडलेला आहे. हा पाठींबा किती व्यापक होता याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईच्या ज्या डबेवाल्यांनी स्वतःच्या सेवेत कधी खंड पडू दिला नाही ते मुंबईचे डबेवालेही एक वेळचं काम बंद ठेवत या आंदोलनात उतरले.

वेसण घातलेला बैल शिंग उगरणारच नाही असं नाही पण कमीत कमी वेसण असलेल्या बैलाच्या वेसणीला हात घालण्याचं धाडस तरी करता येत. तसंच लोकपाल आणून भ्रष्टाचार पूर्णतः संपुष्टात येणं शक्य नसलं तरी आमच्या पुढार्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वेसणीला हात घालण्याचं धाडस तरी आम्हाला करतं येईल. हे नक्की. 

त्यामुळेच टिम अण्णांमध्ये मतभेद, प्रशांत भूषण यांनी चार कोटी मागितले अशा कुठल्याही गोष्टींवर विश्वास न ठेवता आपण सारे एक राहू………भ्रष्टाचाराला मत देऊ.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s