बाळांना वागवणारे पुरुष आणि……

बाळाला वागवणारे पुरुष ‘बाईची चप्पल ‘ हाच लेख मी काल तिसऱ्यांदा पोस्ट केला. प्रत्येकवेळी या लेखाला एकतरी अत्यंत जहाल प्रतिक्रिया मिळाली. यात ‘ मोगरा फुलाला ‘ ची कांचन कराई होती, या लेखाचा निषेध करणारी ‘ हेरंब ओक ‘ ची प्रतिक्रिया होती, पण खरंच सांगतो कुणाला दुखावणं हा माझा हेतू मुळीच नव्हता.

पण एकीकडे माधुरी दीक्षित असते तर दुसरीकडे राखी सावंत………..एकीकडे अनाथांना कुशीत घेणाऱ्या सिंधुताई सपकाळ असतात तर दुसरीकडे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या सोनिया गांधी. मी या दुसऱ्या वर्गातील स्त्रांविषयी बोलतो आहे. अन्यथा आदिमाया हे स्त्रीचच रूप आहे याची मला पुरेपूर जाणीव आहे.

स्त्रीभ्रूण हत्येत पुण्यात जे डॉक्टर दोषी सापडले त्यात महिला डॉक्टरही होती हे अनेकांना माहित असेल. फ्रेशर्स पार्टी, रेव्ह पार्टी या सारख्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणी पहिल्या………तोकडे कपडे वापरण्या संदर्भातील विरोध मोडून काढण्यासाठी दिल्लीतील स्त्रियांनी काढलेला मोर्चा………हे सारं पाहिल्यानंतर वाटत नाही काही तरी चुकतंय म्हणून ?

एका रसिकेनं प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या बायकोलाच मध्ये आणलं. त्या म्हणाल्या, ” आज तुमची बायको त्या जागी असती आणि धन्यवाद म्हणून त्या पुरुषाला ओळख वाढवण्याची संधी दिली असती तर तुम्हाला आवडल असत का ?” राग नाही आला मला या गोष्टीचा. कारण मी खरंच इतक्या कोत्या मनाचा नाही.

माझ्या बायकोचीच एक गोष्ट सांगतो. आठ दिवसापूर्वी ती बसनं प्रवास करत होती. बसमध्ये फुल गर्दी. माझ्या बायकोनं एका अत्यंत देखण्या आणि उच्च पेहरावात असलेल्या एका स्त्रीला दुसऱ्या एका बाईची पर्स कापून त्यातली छोटीशी मनी पर्स काढून घेताना पाहिलं. इतर कुणी असतं तर म्हणालं, ” असतं जावू दे ना आपल्याला काय करायचय ? कशाला उगीच मागं लचांड लावून घ्या ? ” पण माझ्या बायकोनं तसं न करता काही क्षणात ज्या बाईची पर्स मारली गेली होती तिला सांगितलं. बसमधले सगळे प्रवासी सजग झाले. कंडाक्टरनं बस थांबवली. सिनेमातल्या प्रमाणे ऐनवेळी पोलीस हजार व्हावेत तसे तिथ चौकातच पोलीस होते. त्यांनी पर्स मारणाऱ्या बाईची झडती घेतली. सापडलेले पैसे जिचे होते तिला दिले. थोडीथिडकी नव्हे ५० हजार रुपयांची रक्कम होती.

पैसे मिळाल्यानंतरही ती ओक्साबोक्सी रडत होती. हुंद्क्यांसोबत तिच्या ओठातून जे शब्द बाहेर पडले त्या शब्दांची कहाणी अशी –
ती स्त्री अत्यंत गरीब होती. तिच्या यजमानांना हृद्य विकाराचा जोराचा झटका आला होता. त्यासाठी त्यांना इस्पितळात भरती केलं होतं. उद्या शस्त्रक्रिया होती. काही लाख लागणार होते. ती इकडून तिकडून पैसे गोळा करून आणत होती. हे ५० हजारही असेच कुणा परीचीताकडून उसने आणलेले. हे पैसे गेले असते तर काय केलं असतं या विचारणं तिला घाम फुटला होता. काय म्हणायचं अशा पाकीट मारणाऱ्या स्त्रियांना ?

म्हणूनच मी स्त्रियांना दुषणे देतो आहे असा अर्थ या लेखातून कुणी काढणार असेल ते अत्यंत चुकीचं आहे. स्त्रियांची मानसिकता बदलावी एवढीच माझी अपेक्षा. पुरुषांचीही स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता अगदीच विचित्र असते हेही मला माहिती आहे. पण स्त्रीची धारदार नजर अशा कोणत्याही मानसिकतेला पायबंद घालू शकते. मर्यादा सांभाळताना माणुसकी आणि सौजन्य सोडून वागण्याची काहीच गरज नसते.

आजच्या एका प्रतिक्रियेत एका रसिकेनं, ” स्त्रियांना केर काढणं, धुनी धुणं अशा हलक्या स्ल्क्या कामाची सवय असते. त्या मुले कदाचित तुमची चप्पल पडली असती तर त्या बैंनीही तुमची चप्पल उचलून दिली असती.” असा म्हणालं आहे. स्त्रियांच्या कामाविषयी त्यांच्या म्हणण्यात निश्चित तथ्य होतं. आता काही अंशी परिस्थिती बदललीय. अलीकडे कित्येक वेळा मी लहान बाळांना वागवणारे पुरुष आणि स्वतःचा पदर आणि पर्स सावरत मिरवणाऱ्या स्त्रिया पहातो. पण तेच माझ्या गावाकडे जातो. तेव्हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड कष्ट करणाऱ्या माझ्या भावजया आणि पाठीवरती हात टाकून लष्कराच्या भाकरी भाजत फिरणारे माझे चुलत भावू पहातो तेव्हा वाटत स्त्रीशिवाय या जगाचा गाडा चालू शकेल ? माझ्या लेखाची बाजू सावरायची म्हणून हे लिहित नाही. खरंच असे विचार माझ्या मनात येवून गेलेले आहेत.

एक दिवस मी आणि माझा मुलगा टिव्हीवर ‘ थ्री इडीयट्स हा सिनेमा पहात होतो. त्यातला तो व्हायरसच्या मुलीच्या बाळंतपणाचा प्रसंग सगळ्यांच्याच चांगला परिचयाचा असेल . तिच्या वेदना पाहून मी माझ्या मुलाला म्हणालो, ” आदि बेटा, पाहिलंस ना किती वेदना होत असतात आईला बाळाला जन्म देताना.”

त्यांना हुंकार भरला, ” म्हणून आईला कधीही दुखवायचा नाही. कळलं ना ? “

हाही एक वास्तववादी प्रसंग. आता थांबतो. मला स्त्री विषयी आदर नाही असा म्हणायला कुणालाही जागा राहू नये म्हणून आजचा लेखन हे सारं लेखन.

Advertisements

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s