म्हणूनच

आज खूप दिवसानंतर लिहितोय. लिहायला विषय नाहीत असा नाही, वेळच नाही हेच खरं कारण. कारण विषयाला तोटा मुळीच नसतो. अगदी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी तुम्हाला दिलेल्या नाहीत. पण मी मी शुभेच्या दिल्या नाहीत म्हणजे मी तुमचा अहित चिंततो आहे असं मुळीच नाही. जगात प्रत्येकाचं कल्याण व्हावं हीच माझी भूमिका. नौकरी सोडल आहे. गावी जावून शेती पहातो आहे. आता माणसं जवळून दिसताहेत. त्यांचे अंतरंग न्याहाळता अनुभवतो आहे. म्हणजे आजपर्यंत माणसं पहात नव्हतो असं नाही. पण आजपर्यंत भाजी भाकरी आणि रोजच्या विवंचनातच बुडून गेलेलो असायचो. पण आज लिहायला बसलोय ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या  शुभेच्छा देण्यासाठीच –

तिळगुळ, संक्रांत

Leave a comment