म्हणून यंदा गावभवाने

२४ नोहेंबरला मी ” शरदला चांदणं ” हा लेख लिहिला होता. तेव्हाही खूप धावपळीत होतो. त्यानंतरच्या गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ तीनचार पोस्ट केल्या. नौकरी सोडली होती. गावी शेतीकडे पहात होतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माझ्या बहिणीने नगरसेवक या पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. प्रचाराची धामधूम सुरु होती. गावाकडेही जा – ये चालूच होती. या सगळ्या कालावधीत ब्लॉग आणि मेल पहायला कधी वेळच मिळाला नाही. कविताही लिहिणं झालं नाही.

त्यातूनही काही विचार चोरपावलांनी मनात प्रवेश करायचे. त्या विचारंना फार वेळ मनात थारा द्यायला सवड नसायची. गेली वर्षभर शेतकऱ्याची फरफट फार जवळून पाहतो आहे.

गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस शेकऱ्यांच्या मुळावर आला आहे. ओढे कधीच आटलेत. विहिरी सुद्धा खोल श्वास घेवू लागल्यात. गावोगावच्या जत्रा जवळ आल्यात.

पण शेतकऱ्यांची परवड चालूच आहे. कांद्यानं शेतकऱ्याचा जीव नकोसा करून टाकलाय. मजुरी बरी पण शेती नको. अशी अवस्था झालीय. रणरणत्या उन्हात सावलीचाच काय तो आधार. पण रिकाम्या पोटाला आणि खिशाला सावलीचा काय उपयोग. येणारे सण-सुद, यात्रा-बीत्रा कशा साजऱ्या करणार ? शेतकऱ्याला खाऊ कि गिळू असं करणारं एक पृथ्वीच्या आसा एवढ प्रश्नचिन्ह ? सण-सुद, यात्रा-बीत्रा कशा साजऱ्या करायच्या ? चिंध्या झालेली कापडं घालून कसं जायचं जत्रेला ? आलेल्या पै पाहुण्यांना खाऊ पिऊ काय घालायचं ? आपण आपलं जगतो आपल्या खोपटात कसंही मीठ भाकरी खाऊन. पण पाहुण्यांना कशी दाखवायची आपल्या आयुष्याची लक्तरं ? जाऊं दे यंदा जत्रा साजरी करूच नये. म्हंजी नवी कापडं घ्यायला नको आणि पै पाहुण्यांना  बोलवायला नको.

अशी शेतकऱ्याच्या मनोगताची मनोमन जुळणी करताना वाटलं……जर प्रत्येक शेतकर्यानं असं विचार केला तर यंदा गावोगावच्या जत्रा कशा भरतील ? आणि मग यंदा जत्रा का भरली नाही हे गाव देवीला कुठल्या शब्दात सांगता येईल असं विचार करताना सुचलेली हि चारोळी –

म्हणून यंदा गावभवाने

म्हणून यंदा गावभवाने

Advertisements

2 Comments

  1. अगदी मोजक्या शब्दात शेतकऱ्यांची अवस्था मांडली आहे….चारोळी अप्रतिम आहे…!!!

    • अतुलजी पोस्ट करून तास दीडतासही झाला नाही. इतक्यात आपण अभिप्राय दिलात. खूप खूप आभारी आहे. व्यथा खूप असतात. सगळ्याच शब्दात पकडता येत नाहीत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s