इवलीशी चित्रकार

( यातली चित्र पहावीत अशीच आहेत. तुमचा अभिप्राय नक्की हवाय. माझ्यासाठी नव्हे त्या इवल्याशा कलावंतासाठी  )

२००१ साली माझा ‘ मुलांच्या पाठीवर एवढे ओझे येते कुठून ? या मथळ्याखालील लेख ‘ दैनिक सकाळ ‘ मधून प्रकाशित झाला होता. त्यानंतर आठवीपर्यंत परीक्षा नकोत असाही निर्णयाय आमच्या शासनानं घेतला. पण मुलांच्या पाठीवरला ओझा काही केल्या कमी होत नाही. त्या लेखात मी असं म्हणलं होतं कि चित्रकला, शिवणकला यासारखे विषय एछिक असावेत. अलीकडे तर सामाजिक विज्ञान, अर्थशास्त्र यासारखे विषयही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत. का एवढी घाई मुलांच्या मेंदूत एकाच वेळी सारं काही कोंबण्याची ?

फुग्यात प्रमाणापेक्षा जास्त हवा भरली तर फुगा फुटतो हे आम्हाला कळतं. मग  मुलांच्या मेंदूची काही एक मर्यादा असेल हे आम्हाला का नाही कळत. मुलांवर अभयस लाडू नये असं मानसशास्त्र शिवाय सांगतं पण पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात कोणता पालक मुलांचं मानसशास्त्र लक्षात घेतो. मुलांचं काळ लक्षात घेवून त्यांना प्रोत्षण देणारे पालक विरळाच असतात. आणि म्हणूनच एखादाच सचिन तेंडूलकर, एखादीच लता मंगेशकर नावारूपाला येते. बाकी सारे धावत रहातात …..छाती फुटून घायकुतीला येतात.

मुलांच्या मानसिकतेचा विचार करणाऱ्या अशाच काही पालकांविषयी –

विवेक काळे हा माझा मित्र. व्यवसायानं इंजिनियर. बुद्धीन प्रगल्भ. चित्रकलेचा कुठलाही शिक्षण न घेता एक अंगभूत चित्रकार. कधीकाळचा कवी. कॉलेजात रंगमंचावर वावरलेला अभिनेता. पुढा व्यावसायिक यशाच्या पाठीशी धावताना या साऱ्या अंगभूत कलागुणांच बोट सोडून देणारा. लग्न झालं. फ्ल्याट घेतला. मुलगी झाली. हळू हळू मोठी होत गेली त्याच्या घरी जायचो तेव्हा एका रूममधल्या भिंती क्रेयान्सन रेखाटलेल्या दिसायच्या. मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, ” हि भिंत आम्ही आमच्या मुलीसाठी राखून ठेवलीय. तिला जे काही रेखाटावसं वाटेल ते तीन या भिंतीवर रेखाटावं.” मला स्वतःला माझ्या मुलांनी भिंतीवर असं काही रेखाटल असतं तर चाललं नसतं. कारण मुलाच्या मानसिकतेपेक्षा, अशी भिंत किती विचित्र दिसेल आणि तिला पुन्हा रंगवायला किती खर्च येईल याचा विचार मी प्राधान्यानं केला असतं. या मुलीच्या चित्रातल्या प्रगतीचा पुढे काय झालं मला माहित नाही. पण अशा प्रकारच्या मुलांना दिलेल्या स्वातंत्र्यातून त्यांची मानसिक जडण घड खूप चांगली होते यावर माझा खूप विश्वास आहे. आणि त्या मुलीची तशी मानसिक जडण घडण झाल्याचा मी पहातो आहे.

असाच आणखी एक पालक. माझा मेव्हणा. डॉ. भाभा अणुशक्ती केंद्रात संशोधनात व्यग्र असलेला. राजेश विष्णुपंत कोळेकर. त्याच्याही घरात दुडदुडणाऱ्या पावलांबरोबर रंगत गेलेल्या भिंती मी पहिल्या. परवा खूप वर्षानतर तिथे गेलो होतो. तळता एवढी गौरी आता चौथीत शिकत होती. एकेकाळी भिंती रेखाटणारे तिचे हात आता कागद समोर घेवून बसले होते. मी तिची रंगकामाची वही हाती घेतली आणि अचंबित झालो. तिचंच एक चित्र एका संस्थ्येन त्यांच्या वार्षिक अंकासाठी मुखपृष्ट म्हणून वापरलेलं. तिचे आणि तिच्या चित्रांचे मी काढलेले फोटो –

fish

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s