हीच का आमची लोकशाही ?

( कुणाला बदनाम करणं हा हेतू नाही या सगळ्याचा. पण यातला व्हीडीओ आणि त्यातल्या स्ट्रिपलाईन हा पुरावा आहे.)

यावेळी खऱ्या अर्थानं माझा राजकारणाशी संबंध आला. मागच्या दोन्हीवेळी मी किनाऱ्यावरचा प्रवासी होतो. म्हणजे प्रवाहात झोकून द्यायची इच्छा नव्हती असं नाही. पण नौकरीच्या पाशात अडकलेलो होतो. त्यातही आणखी प्रोडक्शन म्यानेजर. म्हणजे घाण्याटला बैल म्हणा किंवा घाण्यातले शेंगदाणे म्हणा. सुटका नाही. पण यावेळी ते जू  ( बैलगाडीला किंवा नांगराला जुंपताना बैलाच्या खांद्यावत असता ते.) आधीच झुगारून दिला होतं. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत माझी बहिणीला नगरसेवक या पदासाठी शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. आणि मला प्रचार मोहिमेसाठी पुरसा वेळ देता आला.

खरंतर निवडणुकीच्या आधी चारसहा महिन्यांपासून या प्रकाराकडं मी लक्ष ठेवून होतो. हे मी केवळ आमच्या मतदार संघापुरतं बोलत नाही. सगळ्याच मतदार संघात दिवाळीपासून मतदारांच्या घरी पोहचणारे मिठीचे पुडे आणि भेटवस्तू पहाता होतो. वर्तमान पत्रातूनही त्याविषयी खूप काही लिहून येत होतं. पण निवडणुकीच्या आधी महिनाभर मी आमच्या प्रभागात पोहचलो आणि मला फार जवळून सारं काही पहाता आलं.

उमेदवारांनी पैशाची मस्ती चढलेली असते असते आणि गरीब मतदारांना एका मतासाठी मिळणाऱ्या हजार दोनहजार रुपयांचं व्यसन लागलेला असतं. हा पैसे घेवून मत देणारा मतदार आता एवढा धाडसी झालाय कि तो प्रत्येक उमेदवारांकडून मतागनिक मिळणारे पैसे तो घेतोच पण समजा एखाद्या निवडून येण्याची दाट शक्यता असलेल्या एखाद्या उमेदवाराकडून त्याला पैसे मिळाले नाहीत तर तो त्या उमेदवाराला सरळ सरळ पैसे मागायलाही कमी करत नाही. अगदी मीसुद्धा यातून गेलो आहे. पण पैशापुढे आमची अक्कल चालू शकणार नव्हती. आम्ही हतबल असायचो. मग मी उपदेशाचे चारसहा डोस पाजून त्या गृहस्थांचं मन वळविण्याचा प्रयत्न करायचो.

आमच्या प्रभागात गेल्यावेळी नगरसेविका असलेल्या महिला उमेदवाराची एक हस्तक पैसे वाटताना पकडली गेली. त्या हस्तक बाईन मला अमक्या अमक्या उमेदवाराच्या नवऱ्यानं पैसे आणून दिल्याचं सांगितलं. पोलीस आले. पंचनामा झाला. दोषींना अटक झाली. टिव्ही वर बातमी झळकली. सगळ्याच प्रमुख वर्तमानपत्रांनीही या बातमीला स्थान दिलं. पण फरक काय पडला. ती उमेदवार उजळ माथ्यानं हिंडत होती. इतकाच काय तर दोन हजारांपेक्षा अधिक मतदान घेवून ती तीन क्रमांकावर राहिली. आणि दोन आणि तीन या क्रमांकावरील उमेदवारांच्या मतात फरक फोटा तो केवळ १५ मतांचा. म्हणजेच एवढा घडूनही तला मतदारांनी नाकारला असं म्हणता येणार नाही.

आणखी एका ठिकाणी तर तमाशातल्या फडात नाचणाऱ्या ललनेवर मिशीला पीळ मारत दोघांनी पैसे उध्ळवेत तसे एकाच मतदारावर त्या प्रभागातील दोन उमेदवारांनी पैसे उधळल्याची बातमी वर्तमान पत्रातून झळकली होती.

उमेदवारी हवी असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये असा संकेत आहे. पण ऐन निवडणुकीच्या काळात गुंडगिरीने वागणाऱ्या आणि दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेस्वरांना कोण शासन करणार.

हे दोन्ही प्रकार माझ्या अवतीभोवती घडलेले. सहाजिकच मी एक निनावी अर्ज लिहिला. त्यात आमच्या विरोधातील उमेदवाराने पैसे वाटल्याच्या आणि आणखी एका प्रभागातील दोन उमेदवारांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेचा उल्लेख केला आणि सदर अर्ज घेवून आमच्या महानगर पालिकेच्या निवडणूक आयुक्तांना भेटलो. आणि या दोन्ही ठिकाणच्या या दोषी उमेदवारांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पण कसलं काय ! या संदर्भात कसलीही कारवाई करण्यात त्या अधिकाऱ्यानं असमर्थता दाखवली. प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तसा आम्हाला अधिकार नाही. हवा असेल तर तुम्ही मुंबईला जा.

हा पैशांचा पाऊस फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीतच पडला असं नव्हे काही. जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही हेच घडलंय. या प्रचारादरम्यान दोन दिवसांसाठी गावी गेलो. तेव्हा चुलत बहिण तिचं दुख सांगत होती. ‘ आरं बघणा इज्या त्या बाप्प्यान XXXदादाकडून अडीच लाख रुपये आणल्यात वाटायला आणि मला दिल्यात नुसतं हजार रुपय. आता माझ्यासारख्या शेळ्या मेंढ्या मागं फिरणाऱ्या बाईला जरा जास्त दिवू न्हाईत व्हाय. आमच्याकड काय जमीन जुमला हाय का ….आमचा ऊस जाणार हाय ? ”

आता सांगा कसं हिला लोकशाही म्हणायचं.

इंदिराबाईंनी भले तीस वर्षापूर्वीच ‘ गरिबी हटाव ‘ अशी घोषणा केली होती. पण आजतागायत गरिबी हटली नाही. आणि ती हटावी, समाज शहाणा व्हावा अशी कुणाचीच इच्छा नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची तर मुळीच नाही. कारण भुकेकंगाल शहरवासी आणि दरिद्री शेतकरी हीच त्यांची बलस्थानं आहेत. हेच आहे त्यांचं गठ्ठा मतदान.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s