मी ….अपयश आणि सचिन

अपयश हि यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. असं असला तरी अपयश कुणालाच नको असतं. आणि ज्यानं आयुष्याच्या प्रत्येक पावलाला केवळ यशाचाच अनुभव घेतला आहे त्याला तर अपयशाची सावलीही नको असते.

आता माझंच पहा ना ! मी किती साधासुधा माणूस. पण मलाही अपयश नकोच असतं. सचिन ८० वर होता तेव्हाच मी सचिनच्या महाशतकाविषयी लिहायला बसणार होतो. पण भीती वाटली नाही झालं शतक तर ? काय नुकसान होणार होता माझं ? पण नाही इच्छा झाली लिहायची.

अर्धा पाऊन तास बसलो टिव्हीसमोर. सचिन ८० वरून ८७ वर. शेवटी वैतागलो. नेटवरून सचिनचा एक फोटो शोधला. दोनचार वाक्य लिहिली. पुन्हा टिव्हीसमोर गेलो. सचिन ९०० वर. तेवढ्यात त्यानं एक धाव घेतली आणि शतकांच्या शतकाला गवसणी घातली.

बस्स. आता हा अश्वमेघ थांबला तरी हरकत नाही. मला अजूनही सचिनच्या कुवतीविषयी आणि त्याच्या फॉर्म विषयी शंका नाही. पण कसं आहे. धावा झाल्या नाहीत तर टीका करणारे तोडे नसतात. पत्रकार आणि मिडिया तर सर्वात पुढे. पण आता शर्यत संपली आहे. त्यामुळे सचिन त्याचा नैसर्गिक खेळ खेळेल आणि अधिकाधिक धावा करून भारताच्या विजयाला हातभार लावेल. त्यामुळेच त्याला जोपर्यंत खेळायचे आहे तोपर्यंत खेळू द्यावे. योग्य वेळी तो स्वतःच त्याची निवृत्ती जाहीर करेल. तोपर्यंत आपण फक्त त्याच्या खेळाचा आनंद घेत रहावे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s