कलियुग का जहर

दहावीच्या हिंदीच्या पुस्तकात एक धडा आहे. त्या धड्याच नाव ‘ जादूगर ‘.

ती गोष्ट अशी-

एक राजा होता. माधवपूर हे त्याचं राज्य. त्याच्या राज्यातली प्रजा खूप कष्टाळू आणि सुखी होती. पण एक दिवस त्या राज्यात एक जादूगर आला. चौकात उभं राहून बाटलीतून एक औषध विकू लागला. त्या औषधाला त्यानं ‘ कलियुग का अमृत ‘ असं नाव दिलं होतं. तो त्या औषधाचं खूप गुणगान करत असे. ते औषध प्राशन केल्यानं –

मूर्ख शहाणा होतो……

 दुर्बल बलवान होतो……..

थकवा दूर होतो……..

 कामाला जोर येतो……..

 गरीब श्रीमंत होतो……..

आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतो.

असं सांगत असे.

सुरवातीला त्यानं एका बाटलीची किंमत केवळ चाराने ठेवली होती. लोक जमा होत. पण ते औषध घेत नव्हते. जादूगार थकला नाही. तो त्या औषधाची स्तुती करत राहिला. हळूहळू काही लोक ते औषध घेवू लागले. त्या औषधामुळे वाटणारी मजा इतरांना सांगू लागले. इतरही लोक ते औषध घेऊ लागले. आता राज्यातले जवळ जवळ सर्वच लोक ते औषध घेत होते. पण ते औषध नव्हतं तर ती दारू होती.

 राज्यातले सगळेजण दारूच्या आहारी गेलेले पाहून जादूगारानं त्या बाटलीची किंमत एक रुपया केली. पण लोकांना या वाढलेल्या किंमतीचा भान उरलं नाही. ते दारू घेत राहिले……कंगाल होत राहिले. राजालाही त्या जादुगाराकडून महसूल मिळत होता. सहाजिकच राजाही त्या जादुगाराची पाठराखनच करत होता. राज्यातली प्रजा भिकेला लागत होती. पण माधवपूरच्या राजाला सरतेशेवटी जाग आली. त्यानं त्या जादूगाराला राज्यातून हाकलून दिलं.

माधवपूरच्या राजाला जाग आली असली तरी आमचं सरकार मात्र कधीच जागं होणार नाही. कारण दारू आणि पेट्रोल हे महसूल वसुलीचे हुकमी मार्ग आहेत असा आमच्या सरकारला विश्वास आहे. जनता गाड्या घोड्या घेते आहे. त्या गाड्या घोड्या ती दारात उभ्या करून थोड्याच ठेवणार आहे. ती बाराण्याचं नाही तर चाराण्याचं का होईना पेट्रोल गाडीत घालणारच. आणि या विश्वासापोटीच गेल्या दोन वर्षात सरकारनं पेट्रोलचे भाव दुपटीनं वाढवले आहेत.

सुविधा म्हणून आपण गाड्या घेतो पण ती सुविधाच आपली गरज बनून जाते. आणि मग आपण हतबल होतो. माधवपूरच्या प्रजेसारखे.
 
आपल्या सरकारला शहाणपणा येत नसला तर आपण काय फक्त बघ्याची भूमिका घेणार आहोत काय ? या सरकारला आम्ही कधीच धडा शिकवणार नाही काय ?  
Advertisements

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s