कशाला जायचं चंद्रावर ?

कदाचित माझे विचार अनेकांना पटणार नाहीत. पण खरंच आपण विचार करायला हवा.

२० जुलै १९६९ रोजी अमेरिकेन अपोलो हे अंतराळयान चंद्रावर पाठवलं. मानवानं चंद्रावर टाकलेलं ते पाहिलं पाऊल. त्याला आज कितीतरी दशकं झाली. त्यानंतर आजतागायत विविध प्रगत राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या ग्रहांवर अंतराळयानं पाठवण्याची चढाओढच लागली. अगदी आपला देशही त्याबाबत मागे राहिला नाही. अशा प्रकारे विविध अंतराळयानं पाठवल्यामुळे आपल्याला अवकाशाचा अभ्यास करणं शक्य झालं. तिथ वातावरण आहे हि नाही ? तिथ पाणी होतं हि नव्हतं ? तिथ जीवसृष्टी होती कि नव्हती ? तिथल्या मातीचा अभ्यास ? त्यात्या ग्रहांची छायाचित्र ? आज काही देश तर चंद्राचीही वाटणी करू पहाताहेत. त्यावर आपला मालकी हक्क सांगू पहाताहेत. कशासाठी हे सारं ?

विज्ञानातील प्रगतीनं माणसाचं जीवन सुखकर झालं हे खरं आहे. प्रवास सुखकर झाला. संदेश वहनात कमालीची प्रगती झाली. टिव्हिच्या पडद्यानं देशविदेशातल्या सीमा बुजवून टाकल्या. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही अप्ताशी दृश्य रुपात बोलता येऊ लागलं. विमानाच्या साह्यानं मानवाला वारयाशीही स्पर्धा करता येऊ लागली. वैदक शास्त्रात खूप प्रगती केली. टेस्टटूब बेबी जन्माला घातली. कितीतरी दृर्धार आजारांवर मात केली. असं खूप काही आणि कितीतरी सांगता येईल. पण हे सारं झालं म्हणजे काय झालं ? आपण आपल्या आयुष्याची दोरी ताणू शकलोत. आपण आपल्या आयुष्याला विलासी बनवलं.

पण विज्ञानानं एवढी प्रगती केलेली असूनही आज जेव्हा जून उलटत आला तरी पाऊस पडत नाही तेव्हा आपल्याला आभाळाकडं पाहण्याशिवाय इलाज उरत नाही. स्तुनामी येते अनेकांचा जीव घेते आणि आपण पहात रहाण्याशिवाय काहीही करू शकत नाही. भूकंप येतो आणि जीव मुठीत ठरून घराबाहेर पडण्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. आणि तरीही आपण म्हणतो विज्ञानानं खूप प्रगती केलीय.

म्हणजे मानवानं परग्रहांवर जाऊ नये. त्यांचा अभ्यास करू नये असं नाही म्हणायचं मला. मला म्हणायचं ते एवढंच कि विज्ञानानं मानवाच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी कंबर कसली पाहिजे. पुरेसा पाऊस पाडण्यासाठी विज्ञान उपयोगी पडलं पाहिजे. नैसर्गिक आपत्तींची मानवाला पूर्वसूचना मिळण्यासाठी विज्ञान धडपडल पाहिजे.

पण आज आम्ही एकविसाव्या शतकात वावरतो आहोत पण पाऊस लांबला कि आम्हाला पाणी कपात करावी लागते. पाऊस खूप पडला कि ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. पुराच्या लोंढ्यात वाहून जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरत नाही. एखादी वावटळ छतांवरचे पत्रे उडवते आणि गावच्या गावं सपाट करते. त्याक्षणी लक्षात येतं प्रगतीच्या गप्पा मारणारे किती क्षुद्र आहोत आम्ही. आम्ही कितीही प्रगती केली तरी ‘ पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ‘ हेच खरं.

Advertisements

2 Comments

  1. वाक्य न वाक्य पटलं.
    मुंबईच शांघाय करायला निघालो आहोत पण मुलभूत सुरक्षितता आणि स्वच्छता पण आपण करू शकत नाही. प्रगत देशांना नुसतच आंधळेपणाने COPY PASTE करण्यापेक्षा जरा अक्कल आणि विचारशक्ती वापरण गरजेच . प्रगती करताना निसर्गच आणि पर्यावरणाच महत्व पण लक्षात घेण जरुरी आहे. नाहीतर आणखी काही वर्षानी मानव जातीच र्हास निश्चित

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s