प्रश्न

( या पोस्टमधल्या मुलाला पडलेला प्रश्न स्वभाविक नाही काय? )

आपल्याकडे शिक्षण समित्या असतात. त्या समित्यांवर अनेक शिक्षण तज्ञ असतात. तरीही अभ्यासक्रमात कोणतीही सुसूत्रता नसते. बर्याच वर्षापूर्वी ” मुलांच्या पाठीवर एवढे ओझे येते कुठून ” हा माझा लेख दैनिक सकाळमधून प्रकाशित झाला होता. अर्थात माझ्या लेखामुळे परिस्थितीत कोणताच बदल झाला नाही.

अनेक मंत्री आले. त्यांनी अनेक प्रयोग केले. वर्तमान पत्रातून झळकणारी गुणवत्ता यादी गायब झाली. अगदी आठवी पर्यंत परीक्षाच नकोत. इथपर्यंत निर्णय झाला. कारण काय तर म्हणे निकालानंतर मुले आत्महत्या करतात. पण आता परीक्षाच नसल्यामुळे मुलं अभ्यासाच्या बाबतीत अधिक बेफिकीर झालीत. पालकही सुस्तावलेत. आणि मुलांचा पायाच कच्चा राहू लागलाय. दहावी करायची…….बारावी करायची……..आणि वैद्यकीय अथवा इंजिनिअरिगला प्रवेश मिळावा म्हणून पुन्हा एक तीन तासाची सीईटी नामक प्रवेश परीक्षा द्यायची. म्हणजे दहावी बारावीला घासून केलेला अभ्यासाचा मूल्यमापन हि तीन तासांची परीक्षा करणार. तीही वैकल्पिक स्वरुपाची परीक्षा. असं कसं होऊ शकतं ? आपल्या शिक्षण तज्ञांचा आणि शिक्षणमंत्र्यांचा बोर्डाच्या परीक्षेवर विश्वास नाही का ?

असो मी असे कितीही प्रश्न उपस्थित केले तरी या परीस्थित काहीच फरक पडणार नाही. कारण आपणच दिलंय कोलीत राजकारण्यांच्या हातात. आता आपल्या हाती काहीच राहिला नाही. पण या मुलाला पडलेला प्रश्न आपल्या प्रत्येकाचाच नाही काय ?

school student

school student

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s