तुझ्या चेहऱ्यामध्ये

तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असता त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात………….एका अदृश्य नात्यांना बांधले जातात……….कळत नकळत एकजीव होतात. तो तिचा सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवा असता स्वच्छ………मोकळं………निरभ्र.त्या आभाळातले काळजीचे…….चिंतेचे मळभ त्याला नको असतात. ती रुसलेली, रागावलेली नको असते त्याला. तिचा हसू हेच त्याचं सर्वस्व. म्हणूनच तिला समजावू पहातो तेव्हा तो म्हणतो –

तुझ्या चेहऱ्यामध्ये मला मोकळा आभाळ पहायचय
तुझ्या डोळ्यात चान्न, होऊन बुडून खोल न्हायचय …………..

तू माझी कोण असतेस ?-
कोणीसुद्धा नसतेस
मिटल्या डोळ्यासमोर तरी
चान्न होऊन हसतेस
अबोलीच्या वेलीसारखी
कधीकधी रुसतेस

माणसानं खरा म्हणजे
असं कधी रुसू नये
आपल्या चेहऱ्यावरचं हसू
आपणच पुसू नये

तू अशी रुसलीस कि
मला अगदी रहावत नाही
गाणं येतं ओठावर
तरीसुद्धा गावात नाही
भैरवीच्या रुपात तुझ्या, चेहऱ्यावरती रहायचय
तुझ्या डोळ्यात चान्न, होऊन बुडून खोल न्हायचय………………..

श्रावणातली सर जर
तुला ओंजळीत झेलता आली
कडाडणारी वीज जर
पापण्यावरती पेलता आली

झाडासारखा तरच तुला
मातीमध्ये रुजता येईल
थेंबभर पाण्यातसुद्धा
आतून आतून भिजत येईल

तू अशी चिंब जेव्हा
भिजून भिजून जाशील
काळ्या काळ्या मातीवरचा
हिरवा अंकुर होशील
तुझं हिरवा रूप मला, डोळे भरून प्यायचय
तुझ्या डोळ्यात चान्न होऊन, बुडून खोल न्हायचय………………..

छान दिसतेस अशी तू
गालात हसतेस जेव्हा
अशीसुद्धा छान दिसतेस
ठसक्यात रुसतेस जेव्हा

एक मात्र लक्षात ठेव
रुसवा खूप ताणू नये
दोघांमधल्या  एकांतात
त्याला कधीच आणू नये

माणसाना धुंद होऊन
गार वारं प्यावं
श्रावणातल्या सरींचा
एक थेंब व्हावं
फुलपाखराच्या रंगला
अंगभर ल्यावं
गुलाबाच्या फांदीला
कवेमध्ये घ्यावं
गुलाबाच्या फांदीवरल्या, फुलात तुला पहायचय
तुझ्या डोळ्यात चान्न, होऊन बुडून खोल न्हायचय………….

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s