खरे मित्र

friendship

friendship

आपण जन्माला आल्यापासून तिरडीवर चढेपर्यंत किती माणसं येतात आपल्या आयुष्यात. चढेपर्यंत म्हणण्यापेक्षा चढवले जाईपर्यंत म्हणू. चढवले जाईपर्यंत तरी कशाला म्हणायचं. तेव्हा कुणाला कसलाही विरोध करण्याचं त्राण तर नसतच आपल्यात पण काहीच उरलेलं नसतं आपल्या हाती.
पण ……….

 

 

 

तरीही आपण आयुष्यात अनेक माणसं जोडत असतो.
काही आपण जाणीवपूर्वक ( आपल्या स्वार्थापोटी ) जोडतो.
तर काही आपल्या नकळत आपल्याशी जोडली जातात.
आत आत मनात खूप खोल उतरतात.
तिथ अगदी रुतून बसतात.
कधी जखमेवरची खपली निघावी तशी भळभळून वहातात.
तर कधी आपण असतो खूप हिरमुसलेले तेव्हाच आनंदचा झोका देतात.
किती मित्र असतात आपल्याला. शाळेतले, कॉलेजातले,
कट्ट्यावरचे, बसमधले,
लोकलमधले, प्रवासातले,
कंपनीतले, व्यवसायातले,
चाळीतले, सोसायटीतले, मावळतीच्या टप्प्यावरचे.
अलीकडच्या सोशल वेबसाईटच्या  गजबजाटामुळे मैत्रीचं एक वेगळंच वलय निर्माण.
फेसबुकवरचे,
ओर्कुटवरचे,
ट्विटरवरचे.

यात मी असतोच….तुम्हीही असताच. पण या वलयात अमिताभही असतो, सचिनही असतो, विद्याबालन असतेच पण एश्वर्याही असते.
अमिताभला होणाऱ्या नातीविषयी तो ट्विटरवर काही लिहितो आणि त्याची बातमी होते. सचिन ट्विटरवर चार शब्द खरडतो आणि सगळे वर्तमानपत्रवाले त्या शब्दांचा कीस काढत बसतात. विद्याच्या अकाउंटवर तर रोजच कशाला प्रत्येक क्षणाला उड्या पडतात. पण विजय शेंडगे इथं एक विचार मांडतात. आणि त्याला केवळ काही मोजक्या प्रतिक्रिया येतात. का होतं असं ?

मलाही शंभरभर मित्र आहेत फेसबुकवर. ओर्कुटला आहेत ते वेगळेच. ब्लॉगमुळे संपर्कात आलेले हजारो आहेतच. पण प्रतिक्रिया मोजक्याच का ? मला मित्र मानणारे हजारो जन माझ्या पोस्टवर क्षणभर थांबून प्रतिक्रिया का नाही नोंदवत ? मग शंका वाटायला लागते अंतरजालिय मैत्रीविषयी.
कवी हाच श्रोता आणि श्रोताही कवीच अशी कवींची जशी अवस्था झालीय तशीच काहीशी परिस्थिती मला इथंही पहायला मिळते. म्हणजे कशी तर तू मला लाईक केलंस मी तुला लाईक करीन, मी एखाद्याच्या छायाचित्राला , कवितेला, लिखाणाला प्रतिक्रिया नोंदवतो ती त्यानंही माझं लिखाण पाहावं म्हणूनच. मग या सगळ्यातले खरे मित्र कोणते ?

माझ्या ऑफिसातल्या विवेकला मी माझा खूप जवळचा मित्र मानत असतो. पण त्याला त्याच्या गावाकडचे त्याच्या कॉलेजातले मित्र अधिक जवळचे वाटत असावेत अशी शंका मला वाटत असते. मला माझा जॉब सोडून आठ दहा महिने झालेत पण. माझ्या अनेक सहकार्यांचे मलाfriendship अधून मधून फोन येत असतात. माझं काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ते माझ्या विषयी वाटणाऱ्या आत्मीयतेपोटी कि माझी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याच्या कुतूहलापोटी अशी शंका मला वाटते.

माझ्यापेक्षा खूप सिनियर पदावर काम करण्या श्रीकृष्णाला मी जवळ जवळ वर्षभरानंतर फोन करतो आणि तो खूप जिव्हाळ्यानं ” हाय विजय …..” म्हणत माझ्याशी बोलतो तेव्हा मला खूप भरून येत. प्रश्न पडतो खरी मैत्री कोणती ! पण विवेक काय किंवा श्रीकृष्ण काय आमच्या तारा जुळलेल्या असतात वैचारिक भावनिक पातळीवर. त्यामुळेच त्या मैत्री विषयी शंका उपस्थिती करता येत नाही. ते भेटोत, न भेटोत, फोन करोत न करोत. ते कामी येवोत न येवोत. ते मित्र आणि त्यांच्या माझ्यातल्या मैत्रीत कधीच अंतर पडू शकत नाही.

पण तरीही शालेय जीवनातली मैत्री हीच खरी मैत्री असं एक विधान मला करावंसं वाटतं आहे. त्याला कारणही तसंच आहे त्यासाठी लवकरच लिहितोय नवी पोस्ट असाही मित्र.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s