खरी मैत्री

womenमी परवाच्या खरा मित्र या पोस्टमध्ये ‘ शालेय जीवनातील मित्र हेच खरे मित्र असतात ‘ असं विधान केलं होतं. हे विधान शंभर टक्के खरं आहे असा माझा दावा नाही. पण आयुष्यातल्या इतर कालावधीत भेटणारे मित्र आणि शालेय जीवनातील मित्र यांना एकाच पारड्यात तोलायचं झालं तर शालेय जीवनातील मित्रांचं पारड निश्चित जड ठरेल. पण मैत्रीच्या कुठल्याही टप्प्यावर तुमच्या वैचारिक आणि भावनिक तर जुळायला हव्यात हे निश्चितच. पण शालेय जीवनातील मैत्रीची बाजू घ्यायला तसं कारणही घडलं.

राजू कुचेकर. आमचा इंजीनियारिंगचा मित्र. रंगानं काळा. सावळा हा शब्द जोडून वापरू नये इतका काळा. पण दिलानं मोठा. अंगानं सडसडीत. पहाणाराला वाटावं एका झापडीचाही नाही. पण चार जणांना लोळवण्याची जिगर असणारा.  सगळे त्याला भाऊ म्हणायचे.   मी त्याच्या फार जवळचा नव्हतो. पण मी त्याला चांगला ओळखत होतो. मागच्या चार सहा महिन्यापूर्वी त्याला ह्र्दय विकाराचा झटका आला. आणि वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यातच तो गेला. एकोणीसशे नव्वद नंतर त्याची माझी गाठभेट नव्हती. पण मला फोन आला आणि त्याच्या दशक्रिया विधीसाठी मी त्याच्या गावी पोहचलो. त्याच्या घरी जाण्याआधी गावाबाहेरच भेटायचं ठरलं होतं.

एवढ्या वर्षानंतर आम्ही दहा बारा मित्र एकत्र आलो होतो.  त्यात राजू खोसे होतं, लक्ष्मण ( नाना ) थोरात होता, सातकर होता, कचरे होता, दत्ता शेलार होता, कारंडे होता आणि गोट्याही ( बाळासाहेब आढाव ) होता. pencil sketchराजू खोसे शासकीय नौकरीत आहे.  कारंडे भोसरी एमआयडीसीतला लघु उद्योजक झालाय. आणि दहा बारा कामगारांना सांभाळतोय. दत्ता शेलार शिरूरला मस्त ऑफिस थाटून बसलाय. अनेक धंदे करत असतो. रांजणगाव एमआयडीसी त्यांना चांगलेच पाय पसरलेत. नाना हा आपल्या पालक आणि आदिवासी विकास मंत्र्यांचा सख्खा मेव्हणा. तो मराठी चित्रपट निर्माता झालाय. सातकर त्याच्या गावाचा सरपंच झालाय. सगळ्यांच्या स्टोर्या भारी.

कुचेकारच्या घरची परिस्थिती बेताचीच. गावाकडच्या गावाबाहेरच्या वस्तीत त्याचं घर.  मागे दोन मुलं, विधवा झालेली बायको,  विधवा आई, सख्ख्या भावाची विधवा

बायको. वडील आणि भाऊ काही महिन्यापूर्वीच गेले होते आणि हाही गेलेला. घर निराधार झालेलं. सगळ्यांनी त्याच्या घरच्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहायचं ठरवलं. बसल्या ठिकाणी खिशातून हजार हजाराच्या नोटा काढल्या. एका मिनिटात दहा हजार जमले. त्याच्या घरी गेलो. घरच्यांची समजूत काढली. नानानं मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली. कुणी प्रत्येक महिन्याचा किराणा भरून द्यायचं आश्वासन दिलं. कुणी आणखी काय काय करायचं ठरवलं. तिथून सगळे माझ्या शेतावर गेलोत. आणि तिथून आपापल्या दिशेला. मीpencile sketch या सगळ्याला खरी मैत्री म्हणतोय असं नाही.

त्यानंतर दोन एक महिन्यात शिरूरला दत्ताच्या ऑफिसवर जायचा योग आला. करण्डेही तिथ भेटला. खूप बोलणं झालं. बोलण्याच्या ओघात तो म्हणाला, ” अरे,  तुला माहित आहे का. आपला कुचेकर एक चांगला चित्रकार होता. ”

” नाही. ”

” थांब. तुला दाखवतोच त्याची चित्रं.” म्हणत त्यानं त्याचं कॉम्पुटरचा स्क्रीन माझ्याकडे वळवला. आणि एक फोल्डर ओपन करून त्यात जतन करून ठेवलेली चित्रं मला दाखवली.

मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण हा कुचेकर तसा टुकारच. अर्थात बाकी आम्ही सारे फार शहाणे होतो असं नाही. पण त्याच्यापेक्षा बरे.

” पण तुला हि चित्रं मिळाली कुठे ? ” माझं कुतूहल.pencil sketch

” अरे काय झालं.  परवा नव्या घरात शिफ्ट व्हायला निघालो. आवरताना एक खूप जुनी वही हाताला लागली. पिवळी पडलेली. पावसापाण्यात भिजलेली. उघडून पहिली तर कुच्याची चित्रं. कॉलेज सोडताना ती चुकून माझ्या कडे राहिली असावी. आणि त्यानंतर परवा माझ्या हाती लागली वीस बावीस वर्षांनतर. मग मी ती स्क्यान करून जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मी आहे तो पर्यंत जपेन. कुच्याची आठवण म्हणून.”

शाळेतली मैत्री किती निरागस असते. असं विचार करत मी तिथून बाहेर पडलो.

Advertisements

6 Comments

  1. तुमची पोस्ट फारच आवडली. छान लिहील आहे . शाळेतील मित्र आठवणीत राहतात.खरच आहे ते. पण, मला माझ्या जुनियर कॉलेज मधील मित्र- फारच आठवणीत राहिले. आठवणीत काय मित्र शब्द उच्चारला तरी त्यांची आठवण होते इतके. आवडली पोस्ट आणि त्या द्वारे मांडलेले विचार.

    • ललित खूप आभारी आहे. पण मला शालेय मैत्री म्हणताना. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत सगळाच काळ अपेक्षित आहे. शेवटी शाळा काय आणि कॉलेज काय आपण शिकत असतो आणि शाळा करत असतो हेच खरं. नवा लेख मैत्री तीही गाढवाशी हाही नक्की वाच. आणि प्रतिक्रिया कळव.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s