मैत्री : तीही गाढवाशी.

donkeyसुदंर मुलीच्या प्रेमात कुणीही पडतो. पण रंगानं काळ्या , दात पुढं आलेल्या मुलीकडे कुणी वळूनही पहात नाही. तिलाही प्रेमाची गरज असतेच ना ? पण असा साधा विचारही कधी आपल्या मनात येत नाही. का असं ?

एखाद्या छानछोकी खिसा खुळखुळनाऱ्या मुलाकडे मुली सहज ओढल्या जातात. पण अंगावर साधेसुधे कपडे असणाऱ्या सरळ मार्गी मुलाला मात्र त्या मुर्खात काढतात. त्या मुलालाही मन आहे भावना आहेत याची जाणीवही नसते मुलींना.  का असं ?

सुंदर मुलीच्या प्रेमात पडायला आणि श्रीमंत मुलांना भुरळ घालायला फार बुद्धी लागत नाही. त्यासाठी माणूस भावनाशुन्य असला तरी चालतं.  अशा व्यक्तींच्या प्रेमात पडायला पुरेसा असतो तो व्यवहार. खरी माणुसकी लागते ती जगाला नको असलेल्यांवर प्रेम करायला.
एका परटाकडे असणाऱ्या घोड्याच्या आणि गाढवाच्या मैत्रीची गोष्ट सगळ्यांनाच चांगली माहिती आहे. गाढवाच्या मागे उभं राहिलं तर ते कधी लाथ झडेल ते सांगता येत नाही. त्यामुळे सहाजिकच गाढवाशी मैत्री करायला कोणीच धजावत नाही. गाढवाचा मित्र फार तर गाढवच असू शकतं. पण कुंभाराने हाकलून दिलेला त्या गाढवाला कोणीच मित्र नसतं. मग ते गाढव एका माणसाकडे जातं. आणि त्याला म्हणतं, ”  माझा मित्र होशील ? “. काय करावं त्या माणसानं ? आणि का करावं ? त्याची हि कविता. मैत्री कोणाशी करावी याचा हा विचार.

Donkey

पटतंय का ? मैत्री करयला हवी असते फक्त माणुसकी. 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s