काळ्यापैशाचे स्त्रोत

आपल्या देशात काळ्या पैशाबद्दल खूप बोललं जातं. आपल्या सात समांतर अर्थव्यवस्था उभ्या रहातील इतका काळा पैसा आपल्या देशात आहेत हे मी एम.ए. ला असताना आमच्या अर्थशास्त्राच्या सरांनी सांगितलं होतं. काळ्या पैशाच्या मुद्द्यावरच रामदेवबाबांनी रान पेटवलं होतं. की. विलासराव असोत, माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण असोत, उपमुख्यमंत्री अजित पवार असोत,  मनमोहनसिंग असोत कि रोबर्ट वढेरा असोत काळ्या पैशात हात  बरबटले नाहीत असा नेता शोधून सापडणार नाही.

घोटाळ्यांचे आकडे तर हजार कोटींच्या खाली नसतातच. बरं सारं करून हात झटकून हि मंडळी सगळ्यांना हसत मुखानं तोंड देतात. म्हणजे कसं तर ‘ मी नाय त्यातली आणि कडी लाव आतली.’
यांना कसं जमत हे ?
अशी कसली कातडी असते यांची.
‘ माणूस सोबत काही नेत नाही ‘  हे रस्त्यावरच्या भिकाऱ्याला माहित असणारं सत्य या बड्या मंडळीना माहित नसेल का ? मग पैसा कमवण्यासाठी एवढा आटापिटा का करतात हि मंडळी ? बरं कीर्ती मागे ठेवावी अशी यांची इच्छा असेल तर त्यासाठी अशी कुकीर्ती कशाला. निव्वळ समाजसेवा का करू नये यांनी ?
शासकीय यंत्रणा हेच काळ्या पैशाच सर्वात प्रमुख स्त्रोत आहे असा माझा दावा आहे. या यंत्रणेत पुधार्यांपासून अधिकाऱ्यापर्यंत सगळेच आले. विजय पांढरे यांच्या सारखा एखादा अधिकारी निर्मोही असतो. तो जेव्हा काही सत्य समोर आणू पहातो तेव्हा हि मंडळी त्यांनाच मनोरुग्ण ठरवतात. बाकी सगळ्यांची स्थिती ‘ आपण सारे भाऊ भाऊ……..सारं काही मिळून खाऊ ‘ अशी. अण्णांवर चिखल फेक करतात. केज्रीवालांना जेरीस आणतात. कारण त्यांचं धोरण एकंच ‘ हम तो गंदे हैही , मगर तुमपर भी कीचड़ उछालेंगे.’

शासकीय यंत्रणा हेच काळ्या पैशाच सर्वात प्रमुख स्त्रोत आहे असा दावा करायला एक कारन घडलं. परवा गावाकडे तलाठी ऑफिसात गेलो होतो.  सातबाराचे आणि  आठ अ चे उतारे काढायचे होते. आता तलाठ्याकडे  Laptop  आणि प्रिंटर आलाय. तलाठ्यान A4 आकाराचे एकूण आठ कागद माझ्या हाती दिले. त्याची किंमत होती १२० रुपये. आधी तलाठी एका उताऱ्यासाठी १० रुपये घ्यायचा. आता पंधरा का असा विचारताच तलाठ्यांना एक शासकीय जीआरआर माझ्या हाती दिला. त्यातून कळलं ते असं. कि Laptop , प्रिंटर , पेपर वीजबिल हा सगळा खर्च तलाठ्याला करायचा होता. आणि उताऱ्यासाठी घेतलेल्या पैशातून तो परत मिळवायचा होता.

आता एक तलाठी दिवसापोटी कमीत कमी १००० रुपयांचे उतारे देतो. म्हणजे या सगळ्या सामुग्रीची किंमत केवळ महिन्या दीड महिन्यात वसूल होणार. पण शेतकर्यांकडून कायम वसुली चालू रहाणार. तलाठ्यान दिवसात  किती उतारे दिले, त्यातून किती रक्कम जमा झाली याची कोणतीच मोजदाद नाही. किती काळा पैसा जमा होईल यातून ?

शिवाय ज्या सरकारला एका कागदाची किंमत ठरवता येते त्याच सरकारला शेतमालाची किंमत का ठरवता येत नाही ?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s