भज्जी का चालला ?

खरंतर खूप जुन्या विषया विषयी लिहितोय. खूप वर्षानंतर भज्जीला T20 सामन्यात संधी मिळाली. परवाच्या T20  वर्ल्डकपच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भज्जी खेळला. ४ षटक १२ धावा आणि ४ बळी घेत भज्जीन  झकास कामगिरी केली. आम्ही खूष.

पण पुढच्याच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भज्जीन सपाटून मार खाल्ला. आणि भज्जी आउट.

भज्जीची जादू संपलीय हे सत्य आपण कधी स्वीकारणार ?

हरभजनसिंग हा एक अत्यंत गुणी खेळाडू आहे. पण प्रत्येकाचा एक काळ असतो. सेहवाग आजकाल चालत नाही. सचिन अलीकडे रन्स करत नाही. आपण कधीतरी हे स्वीकारला पाहिजे. नवे पर्याय शोधले पाहिजेत.

खरंतर मला हे सारं लिहीयच  नाही. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भाजी चालला कारण. तो खूप काळ आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर होता. आश्वी नुसत्या गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीतही भरीव कामगिरी करत होता. हरभजनची गरज संपल्यासारखी वाटत होती. लोकांना त्याचा विसर पडत चालला होता. आणि अशाच वेळी त्याला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली. या संधीचा त्याला सोनं करायचं होतं. त्यानं टिच्चून गोलंदाजी केली आणि डोळे दिपवून टाकणारी कामगिरी सर्वांना पहायला मिळाली. सहाजिकच आता पुढच्या सामन्यासाठी त्याच्याकडे कुणीच डोळे झाक करू शकणार नव्हतं. त्याला पुढच्याही सामन्यात संधी मिळाली. आणि शेन वाटसननं त्याला अक्षरशा तुडवून काढलं.

तुम्ही म्हणाल पण त्या सामन्यात प्रत्येक गोलंदाजाची तीच अवस्था झाली होती मग भज्जीला दोष का द्यायचा ?

कारण पहिल्या चार पाच ओहर सारं काही ठीक होतं. पण भज्जी आला आणि शेन वाटसन च्या अंगात भूत संचारल. ते नंतर कुणालाच उतरवता आलं नाही. सहाजिकच निवड समितीन आणि कर्णधारानं यातून बोध घ्यायला हवा. तो त्यांनी घेतलाही कारण पुढच्याच सामन्यात भज्जी संघाबाहेर फेकला गेला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s