आज सोनं लुटू नका

विजया दशमीच्या दिवशी सोनं ( आपट्याची पान ) लुटणं हि परंपरा आहे. पिढ्यानमागून पिढ्या अनुकरण झालं आणि आज ते आमच्या पर्यंत आलं. दसर्याला एकमेकांना आपट्याची पानं देणं हि प्रथा झाली. त्याला शास्त्र काही नाही. काही कथा आहेत.

त्यापैकी एक म्हणजे –रावणाशी लढताना विश्रांतीच्या वेळी श्रीराम त्यांची अस्त्रे शमीच्या वृक्षावर ठेवत. त्यामुळेच श्रीरामांना बळ मिळाले आणि ते युद्धात विजयी झाले.

दुसऱ्या एका कथेनुसार नावाच्या एका ब्राम्हणाचा मुलगा कौत्स मौजीबंधनानंतर वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. सर्व शास्त्रांत पारंगत झाल्यानंतर गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे असा विचार करून त्याने,  ” गुरु दक्षिणा काय देऊ ” असे वरतंतू ऋ‍षीला विचारले.
परंतु वरतंतू ऋ‍षीही हाडाचे गुरु होते. विद्यादान हे उदरनिर्वाहाचे साधन नसून आपला धर्म आहेत असे ते मानीत. त्यामुळेच त्यांनी अत्यंत उदार मनाने उत्तर दिले कि , ”  कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.”
 परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: , ” मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? ”  असे विचारू लागला.
तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, ” मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे.
ही अट कौत्साने मान्य केली आणि तो बाहेर पडला.
रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले.
कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, ” राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे.” हे
कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले.
इंद्राने रघुराजाकडून वेळोवेळी खूप संपत्ती उसनी घेतली होती. परंतु देवाधीदेव असल्यामुळे अनेकवेळा मागणी करूनही इंद्र काही संपत्ती परत देत नव्हता  त्यामुळे रघुराजाने ती संपत्ती वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली.परंतु त्याने फक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

कृष्णाच्या बाबतीतही अशी एक कथा प्रचलित आहे.

परंतु मला सांगायचे आहे ते एवढेच कि शमीच्या झाडाची तोड करून काही मंडळी खरेच सुवर्ण मुद्रा ( आजच्या काळात पैसे ) कमवीत असली तरी त्यामुळे वृक्ष संहार होतो आहे. एक वेळ अशी येईल कि शमीची पाने औषधासही मिळणार नाहीत.

याउपरही आपणास श्रद्धेपोटी सोने लुटायाचेच असेल तर आपण आपल्या दारी एक वृक्ष लावावा आणि परंपरा चालू द्यावी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s