एबीपी माझा : ब्लॉग माझा स्पर्धा

एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचं हे चौथं वर्ष.  एबीपी माझा सलग चार वर्ष हि स्पर्धा आयोजित करते आहे. 30 सप्टेंबर ही स्पर्ध्येसाठी ब्लॉग पाठविण्याची  शेवटची तारीख होती तर नुकताच ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. पण हे सारं आज माहिती झालंय. वेळ गेल्यानंतर. मी त्याविषयी लिहितोय तेही वेळ गेल्यानंतर. वेळ गेल्यानंतर का असेना पण मी त्या विषयी लिहितोय कारण पुढील वर्षी तरी अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सनी या स्पर्थेत सहभागी व्हावं किंवा या स्पर्ध्येची माहिती त्यांच्या पर्यंत पोहचावी. अशी माझी मनापासून इच्छा आहे.

एबीपी माझानं मराठी ब्लॉगर्स साठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून मराठी ब्लोगर्सला एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं आहे. Indibloggar वर अशी स्पर्धा आयोजित केली जाते. पण तिथ मराठी ब्लॉगर्सची वर्णी लागण्याची डाळ शिजण्याची शक्यता खूपच कमी असते. मराठी ब्लॉग विश्व,  मी मराठी , मराठी ब्लॉग जगत् , Marathi blogs, मराठी ब्लॉग कट्टा, marathi blogs directory या मराठी ब्लॉगर्सला व्यासपीठ  मिळवून देणाऱ्या साईटची व्याप्तीही खूप मोठी आहे. मराठी ब्लॉगर्सला खरा वाचक मिळतो तो तिथूनच.परंतु मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे असेल किंवा अपुऱ्या आर्थिक पाठबळामुळे असेल. मनात असूनही या साईट मराठी ब्लॉगर्स साठी खूप काम करू शकत नाहीत. blog update होणं, नव्या blog ची नोंद होणं या गोष्टीतही सुसूत्रता नसते. ब्लॉगर्सना संपर्कही नीट आणि वेळेत केला जात नाही.

त्यामुळेच पुरेसे मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ असणाऱ्या आणि मराठीच्या अस्मितेची जाण ठेवणाऱ्या  एबीपी माझानही Indibloggar प्रमाणेच एखादी योजना आखावी आणि मराठी विश्व,  मी मराठी प्रमाणे एखादी साईट सुरु करावी. सर्व ब्लॉगर्सनं तिथच ब्लॉग प्रकाशित करावेत. तिथंच स्पर्धा आयोजित व्हाव्यात. ब्लॉग्सना क्रमांक द्यावेत.

मला या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही म्हणून हे सारं लिहितो आहे असं नाही. मराठी ब्लॉगर्सचे मेळावे व्हावेत, त्यांनी वेळातवेळ  काढून परस्परांना मार्गदर्शन करावं, एकमेकांच्या गाठीभेटी घ्याव्यात, थोडक्यात त्यांच्या घरोब्या इतकी मैत्री असावी.  असं मला मनापासून वाटतं. हे सारं लिहिण्याला आणखी एक कारण आहे , आज मी एबीपी माझाच्या मुख्य पानावरील ब्लॉग या पानावरही गेलो होतो. पण सभासद होण्याची, नवीन ब्लॉग नोंदण्याची कोणतीही सुविधा तिथ उपलब्ध नाही.

त्यामुळेच माझ्या सूचनेचा आणि विनंतीचा एबीपी माझानं गांभीर्यानं विचार करावा आणि मराठी ब्लॉगर्समध्ये एक सुसूत्रता आणावी.

 


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s