सहावा सिलेंडर

gas cylinder परवा  जि. प. शाळांचे दुखणे भाग -१ , शालेय पोषण आहार हा सागर पाटील यांचा लेख वाचला. याच संदर्भात मी माझ्या ब्लॉगवर आयजीच्या जीवावर बायजी उदार हा लेख लिहिला होता. त्यात मीही या शालेय पोषण आहाराबद्दल लिहिलं होतं. शिक्षकांच्या दृष्टीनं तर ते दुखणं आहेच. पण माझा प्रश्न होता तो हाच कि ‘ जनतेनं कधी आमच्या मुलांना जेवायला घाला ‘ अशी मागणी केली होती ?

हिच काय अशा प्रकारची कोणतीही योजना जनतेच्या मागणीशिवाय सरकारनं राबवू नये. बरं जनतेला अर्थसाह्य करायचं ना मग अत्यावशक अशा सेवेत मोडणाऱ्या गॉसवरची सबसिडी का कमी केली ? पेट्रोलवरची सबसिडी का काढून टाकली ? इतकंच काय शेतकर्यांसाठी दिली जाणारी ठिबक सिंचनावरची सबसिडीही सरकारनं ४० % पर्यंत कमी केली आहे.  आता पुन्हा ९० % सबसिडी द्यायचा विचार आहे. ग्यास सिलेंडरच्या बाबतीतली धोरण ठरवताना सरकारला वेळ लागला नाही पण या बाबतीत दफ्तर दिरंगाई चालूच आहे. कारण इथं सरळ सरळ खायला मिळत नव्हतं.

सबसिड्या कडून टाकणाऱ्या सरकारनं कर कमी करावेत. किंवा सगळीच सबसिडी काढून टाकावी आणि सामान्य जनतेकडून कर घेणं बंद करावं. मी सामान्य जनतेकडून म्हणतोय. उद्योजक आणि व्यापार्यांकडून नव्हे. कारण उद्योजक आणि व्यापारी कर चुकवेगिरी करतातच पण जो काही कर भरतात तो सामान्य माणसाच्या खिशातूनच वसूल करतात.

पण आमच्या सरकारचं भलतंच आहे. ते सामान्य माणसाला वेठीस धरणार आणि उद्योगपतींना आणि व्यापार्यांना पाठीशी घालणार.

घरात सहाच सिलेंडर पुरायला हवेत. त्या पेक्षा अधिक हवे असतील तर जादा पैसे मोजा असं ठणकावून सांगणाऱ्या सरकारनं  त्याही पेक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंग, सलमान खुर्शीद यांच्या घरात वर्षाला किती सिलेंडर लागतात ते पाहायला हवं. अर्थात त्यांना सहाच काय सहाशे सिलेंडर लागले तरी हवी ती किंमत मोजून ते घ्यायची त्यांची आयपत आहे. सामान्य माणसानं काय करायचं ?

सत्तेवर कोणीही असो भ्रष्टाचार होतोच हे आता साऱ्या जनतेला कळून चुकलं आहे. व्यवस्था तिथं दुरावस्था असायचीच. पण किती त्याला मर्यादा असायला हवी. दररोज भ्रष्टाचाराचा एकेक नवं प्रकरण समोर येत आहे. आणि खूप शिताफीनं दाबून टाकलं जातं. भ्रष्टाचाराचा प्रस्थ येवढा वाढलं आहे कि आता मी माझ्या कविता विसरून याच विषयावर लिहू लागलो आहे.

अरविंद केजरीवाल , आण्णा हजारे अशी निर्लोभ मंडळी जेव्हा काही प्रकरणं बाहेर आणू पहातात तेव्हा त्यांच्यावरच चिखलफेक करून आमचे पुढारी हात झटकतात. पण आता मतदारांनी हात दाखविण्याची वेळ आली आहे.

Advertisements