ऑन लाईन मनी ( On line money )

online money

online money

मी गेली अनेक दिवस ऑन लाईन मनी मिळविण्यासाठी धडपडतो आहे. वेगवेगळ्या  साईट  पाहिल्या. अनेक ठिकाणी अकाउंट उघडले. पण ते खूप सोपं नाही हे कळून चुकलं. खरंतर ऑन लाईन मनी हि एक भंपकबाजी आहे असंच मला वाटू लागलंय. संबंधित साईट आपापले व्हिजिटर्स वाढविण्यासाठी असा तुकडा टाकतात आणि आपण वेड्यासारखे त्या साईट्सना भेट देत रहातो. या सगळ्यातून मला जे कळालं ते फार भयंकर आहे. अनेक साईट आपली फार मोठी फसगत करतात. उदाहरणादाखल खाली काही link दिल्या आहेत कृपा करून अशा कुठल्याही साईट्सना भेट देऊ नका. भारतीय ब्लॉगर्सना आकर्षित करण्यासाठी या जाहिरातींच्या मुखपृष्ठावर अनेकदा मराठी, हिंदी, तमिळ, दैनिकांच्या बोध चिन्हांचा वापर केलेला असतो

online money

online money

तर पाश्चात्य ब्लॉगर्सना आकर्षित करण्यासाठी तेथल्या स्थानिक दैनिकांच्या बोध चिन्हांचा वापर केलेला असतो.

online money

online money

मी ब्लॉग  सुरु केला तो माझे विचार मांडण्यासाठी मला एक प्लॉटफोर्म मिळतोय म्हणून. आज दोन एक वर्षात माझ्या रे घना या ब्लॉगला जवळजवळ तीस हजाराहून अधिक रसिक वाचकांनी भेटी दिल्या. मी लिहिलेल्या तीनशे पोस्ट एक लाखाहून अधिक वेळा वाचल्या गेल्या. शेकड्याने प्रतिक्रिया आल्या. हे काही कमी नव्हे.

गूगल अड्स्न्सनं माझं खातं का बंद केलं या बाबतीत कधीच पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही. केवळ तुम्ही आम्ही घालून दिलेल्या terms  आणि conditins मोडल्यात असंच सांगण्यात आलं. खूप पाठपुरावा केला तेव्हा अखेरीस ‘ कुणाचं खातं सुरु करायचं आणि कुणाचं नाही ‘ हि आमची अंतर्गत बाब आहे असं सांगण्यात आलं.

गूगल अड्स्न्स ( google  adsense ), अड्ब्राईत (adbrtie ), अशा काही साईट विश्वसार्हय आहेत नाही अशातला भाग नाही. पण मराठी भाषेला या साईट्सवर स्थानच नाही. आम्ही फक्त १०० % इंग्रजी ब्लॉग वरच जाहिराती देतो असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येतं. तरीही काही मराठी ब्लॉगवर जाहिराती कशा येतात हे त्या त्या मराठी ब्लॉगर्सने आम्हाला समजावून सांगणं गरजेचं आहे.

पण हे सारं लिहिण्यामागचा हेतु एवढाच कि माझे भारतीय ब्लॉगर  मित्रांची फसगत होऊ नये. मग ते मराठीत लिहित असोत, हिंदीत लिहित असोत, इंग्रजीत लिहित असोत अथवा अन्य कुठल्याही भारतीय प्रादेशिक  लिहित असोत. त्यांनी जाहिरात स्वरुपात दिसणाऱ्या कुठल्याही  ऑन लाईन मनी ( On line money ) या बाबीपासून दूर रहावं. कारण अलीकडे तर या ऑन लाईन मनीच्या ( On line money ) जाहिराती पार आपल्या याहू मेल वरही ( Yahoo Mail ) दिसू लागल्या आहेत.

online money

online money

त्यामुळेच आपण अशा जाहिरातींना बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. तेव्हा सावध रहा.

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s