ऊस आंदोलन आणि शेतकरी

Lathicharge on farmer, ऊस आंदोलकांवर लाठीचार्ज

Lathi charge on farmer, ऊस आंदोलकांवर लाठीचार्ज

दौंडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीवर ‘ शेतकरी  सुखी तर ……..जग सुखी.’ असं ब्रीदवाक्य आहे. हे शब्दश खरं आहे. कारण पैसा आमची भूक भागवू शकत नाही. शेतकर्यानं पिकवल नाही तर आम्हाला पैसे असूनही अन्न कुठून मिळेल ? 

पण हे आमच्या सरकारला पटलेलं नसावं म्हणूनच आमचं शासन ऊस आंदोलन चिरडू पहातंय किंवा त्या आंदोलनातून अंग काढून घेऊ पहातंय.  पण अशा रितीने शासनानं ऊस आंदोलनातून अंग काढून घेणं कितपत योग्य आहे ?

शासनाला पेट्रोलियम कंपन्या तोट्यात चालल्यात म्हणून पेट्रोलचे भाव वाढवून दयायला हवेत हे कळतं …….सातबाराचा किंवा अन्य कुठल्याही उताऱ्यापोटी शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या ए 4 साईजच्या कागदाचे १० ते १५ रुपये घ्या असं शासन तलाठी कार्यालयांना ठरवून देतं. सरकारी तिजोरी भरण्यासाठी कर वाढवले पाहिजेत हे कळतं…….लोकसभेत आणि राज्यसभेत पाच वर्ष उमेदवारी केल्यानंतर पुढे आपल्या भविष्याची तरतूद व्हावी म्हणून आपल्याला पेन्शनची तजवीज करून ठेवावी हेही कळतं तेच शासन उसासह कुठल्याही शेतमालाचा भाव ठरवायचं म्हटलं तर अंगं काढून घेतं. का असं ?  

आत्ताच्या राजकारण्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानभूती उरलेली नाही. ते आता शेतकर्यांचे नेते उरलेले नसून कारखानदारांचे , भांडवलदारांचे नेते झाले आहेत. कारखानदारांनी त्यांच्या त्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवायचा पण शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव मात्र व्यापाऱ्यांनी दलालांनी ठरवायचा. ही कुठली रीत ? शेतकरी संघटीत होऊन सर्वत्र लागू पडतील असे आपल्या शेतमालाचे भाव ठरवू शकत नाहीत. म्हणूनच शासनानच पुढाकार घ्यायला हवा. 

अजित पवार म्हणतात कि, ” साखर कारखाने शेतकऱ्यांचे आहेत त्यामुळे त्यांनी बैठका घेऊन भाव ठरवावेत.”

पण साखरकारखाने पुढाऱ्यांच्याच मगर मिठीत सापडलेले आहेत आणि भाकड गाईकडून रतीबाची अपेक्षा करावी त्याप्रमाणे हे पुढारी आणि व्यापारी शेतकऱ्याला पिळताहेत.

२३०० रुपयापेक्षा अधिक भाव देणे परवडणारे नाही असे म्हणणाऱ्या पुढाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वतः च्या मालकीचे दोनदोन कारखाने उभारण्यासाठी पैसा कोठून आणला ते सांगावे. सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांना किती डिव्हिडंड जातो ते सांगावे. उसाच्या वजनात कसा काटा मारला जातो ते सांगावे.

भाजप आणि शिवसेना हे पक्ष जातीयवादी राजकारण करतात असं म्हणत त्यांना बहिष्कृत करू पहाणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच जेव्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीयवादाचा आणि प्रांतवादाचा रंग देऊ पहातात तेव्हा ते कोणतं राजकारण करू पहातात ? शेतकरी कुळातच जन्म घेतलेल्या शरद पवारांनी शेतकर्यांमध्ये अशी दुही पसरवण आणि शेतकर्यांमध्ये दुफळी माजवण कितपत योग्य आहे ?
मुळात झालंय काय. गेल्या तीन एक वर्षात राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहून शरद पवारच काय तमाम पुढार्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलीय.

sugarcane rate, ऊस आंदोलन

sugarcane rate, ऊस आंदोलन


एके काळी शेतकर्यांचे नेते म्हणून ओळख असलेले शरद पवार आता शेतकर्यांचे नेते उरले नाहीत. त्यांना आयसीसी, बीसीसी च्या राजकारणात रस वाटू लागलाय. नेतृत्वहीन झालेल्या शेतकर्यांची धुरा राजू शेट्टींनी खांदयावर घेतली. सहाजिकच शेतकरी त्यांच्या मागे गेला. त्यामुळे अशा प्रकारचं गलिच्छ वक्तव्य करून स्वतःची प्रतिमा मलीन करून हात चोळत बसण्यापेक्षा शरद पवारांसह सर्वच साखर सम्राटांनी आत्म परीक्षण करायला हवं.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s