ऊस आंदोलनाला हिंसक वळण

sugar cane

sugar cane

आज सकाळी ‘ एबीपी माझा ‘ वर एक पोल घेतला होता. प्रश्नाचं स्वरूप होतं ते असं. ‘ ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागणे योग्य आहे का ? ‘ तीन पर्याय होते. ‘ होय ‘ , ‘ नाही ‘ आणि ‘ सांगता येत नाही.’

मी माझं ‘ नाही ‘ असं मत नोंदवलं होतं. नंतर पोलचा रिझल्ट पहिला तर ६९ % वाचकांनी ‘ होय ‘ असं मत नोंदवलं होतं. या पोलचा निकाल सांगायचा झाला तर ‘ ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागणे योग्य आहे ‘ किंवा  ‘ ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले हे योग्य झाले ‘ असा सांगता येईल. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, ‘ साऱ्या जगाला अहिंसेचा मंत्र देणाऱ्या गांधीजींच्या देशातला समाज हिंसक झाला आहे का ? ‘

६९ % वाचक जेव्हा  ‘ ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागणे योग्य आहे ‘ असं मत नोंदवतात तेव्हा नाईलाजाने का होईना पण ‘ आमचा समाज हिंसक झाला आहे ‘ असाच निष्कर्ष काढावा लागेल. समाज हिंसक होणं हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीनं घातकच.

पण समाज हिंसक का होतो ?

‘ समाज हिंसक होणं ‘ हि प्रतिक्रया असते.  आणि म्हणूनच या प्रतिक्रियेआधीची क्रिया कोणती हे पहाणे गरजेचे ठरते.

टिव्ही वरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून शेतीमधे कसा आणि किती लाखांनी फायदा होतो हे कितीही हिरहिरीने सांगितले जात असले तरी. शेती करणे हे उद्योगधंद्यान सारखे फायदेशीर नाही. किंवा शाश्वत हि नाही. पण अन्न हि एक मुलभूत गरज आहे. कोणीतरी शेती करणं गरजेचंच आहे. परंपरागत व्ययसाय म्हणून असेल किंवा उदरनिर्वाहाचे अन्य कुठले साधन उपलब्ध नाही म्हणून असेल शेतकरी वर्षानुवर्षे शेती करतो आहे. ‘ उत्पन्न निसर्गाच्या तर भाव दलालांच्या हाती ‘ अशा विळख्यात शेतकरी सापडला आहे. ‘ उत्पन्न चांगले आले तर भाव मिळत नाही आणि भाव असेल तेव्हा उत्पन्न निघत नाही ‘ अशा दृष्ट चक्रात शेतकरी नेहमीच सापडतो.

ऊस हे एकमेव असे पिक आहे कि ज्यावर रोगराई फार पडत नाही. एकरी १०० टन नाही पण पुरेसे पाणी असले आणि थोडेसे खत घातले तर एकरी ३० ते ४० टन ऊसाचे उत्पन्न सहज मिळू शकते.

सकाळी आणि संध्याकाळी चहा हवाच.ते आज प्रत्येक गरज झाली आहे. त्यामुळेच समाजाची दैनिक गरज झालेल्या साखरेचा कच्चा माल असलेल्या ऊसाला निश्चित भाव मिळावा हि शेतकऱ्यांची अपेक्षा चुकीची नाही. पण शासनानं या तडजोडीतून अंग काढून घेणं किंवा या वाटाघाटीत लक्ष घालण्यास नकार देणं हि क्रिया झाली आणि ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कारण शासनानं ज्या सहजतेनं या वाटाघाटीत लक्ष घालण्यास नकार दिला त्यावरून आता अअसं काहीतरी तरी घडल्याशिवाय किंवा केल्याशिवाय शासन आपल्या प्रश्नात लक्ष घालणार नाही अशी ऊस आंदोलकांची धारणा झाली. म्हणजेच ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास कारणीभूत आहे ते आमचं शासन. सत्तेची आणि कायदा सुव्यवस्थेची चावी हाती असल्यामुळे आमचं सरकार राजू शेट्टीवर कारवाई करून आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार हे आंदोलन दडपू पहातंय. खरंतर आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि शेतीविषयक खातं सांभाळणाऱ्या मंत्र्यांनीच या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून  राजीनामा द्यायला हवा. आंदोलकांच्या नेत्याला अटक करून किंवा आंदोलकांवर गोळीबार करून किंवा राजीनामा देऊन प्रश्न सुटत नसतात हे खरं आहे.पण सत्तेला शहाणपण नसतं ना ?

आता गेली दोन वर्ष या प्रश्नी लक्ष घालुन ऊसाचे  भाव ठरवून देणारं सरकार यावेळी अशी हाताची घडी घालून गप्प का बसू पाहतंय ते पाहू.

जवळ जवळ सर्वच कारखाने आजी नाही तर माजी सत्ताधीशांच्याच हाती आहेत. आणि साखर कारखाने हे त्यांच्या सत्तेचे आखाडे आहेत. सहाजिकच शासनानं ऊस आंदोलनाच्या प्रश्नात लक्ष घालणं म्हणजे सत्तेत असणाऱ्या आजी माजी पुढार्यांच नाक दाबल्यासारखं होत होतं. शिवाय गेल्यावर्षी उस आंदोलनाचा प्रश्न हात वेगळा करताकरताच कापसाच्या प्रश्नानं पेट घेतला होता. त्यामुळेच शासनानं यावर्षी हाताची घडी घालून गप्प बसणं पसंत केला होतं . पण अशा प्रकारे शासनाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. उलट पुढाकार घेऊन वाट मार्ग काढणं हि शासनाची नैतिक जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पडलीच पाहिजे.

Advertisements

2 Comments

    • शरदजी, माझ्या ब्लॉगला दिल्याबद्दल आभार. परंतु गेले वर्षभर मी माझ्या या ब्लॉगवर लिहिणे बंद केले आहे. परंतु नव्याने सुरु केलेल्या ‘ रिमझिम पाऊस ‘ या ब्लॉगला आपण नक्की भेट दयावी. आशा आहे आपल्याला माझा नवा ब्लॉग मनापासून आवडेल आणि आपण नियमित भेट देवून संपर्कात रहाल. नव्या ब्लॉगची लिंक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s