दिल्लीतील बलात्कार पिडीतेला अशोकचक्र ?

 

Delhi Rape

Delhi Rape

बलात्कार या विषयाल अनुशंगाने मी मागेच मी मागेच बलात्कार का होतात ?, तर बलात्कारच होतील ??? हे लेख लिहिले आहेत. आणि आज पुन्हा त्याच विषयावर लिहितो आहे. कारण बलात्कारीत तरूणीने साऱ्या वेदना सोसल्या. त्यात तिचा बळी गेला. राजकीय नेतृत्त्व काहीच करत नव्हतं. पण सामान्य जनता रस्त्यावर उतरली. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनतेच्या भावना मी समजू शकतो पण काहीजणांनी मात्र या घटनेचाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठीच वापर करून घेण्याचा प्रयत्न केला.

” बलात्कारा संदर्भातील सुधारित कायद्याला पिडीत तरूणीचे नाव द्या.” हि शशी थरूर यांची मागणी हि अशाच एका फुक्या सहानभूतीचा भाग आहे.

कारण गुन्हेगाराला  शासन होणं ,  खटला काही महिन्यांच्या अवधीत ( अधिकाधिक तीन  महिने ) निकाली काढणे हीच खरंतर महत्वाची बाब पाठपुरावा हवा तो त्यासाठी. पण त्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतः भोवती लौकिकाच वलय असलेली हि मंडळी नको ती विधानं करतात , स्वतः भोवती प्रसिद्धीच आणखी एक वलय निर्माण करतात आणि आंदोलनाची आणि तमाम जनतेची दिशाभूल करतात.

दिल्लीतील भाजपचे शहरअध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी ‘ पिडीत तरुणीला अशोकचक्र देण्याची ‘ मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार देण्यात यावा असेही म्हटले आहे. बलात्कार होणं हि त्या तरुणीला किंवा तिच्या नातेवाईकांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत बोलावून पुरस्कार देण्याइतपत अभिमानाची घटना आहे का ? बर तसे केले तर देशात वर्षभरात किती मुलींवर, महिलांवर बलात्कार होतो. त्या सगळ्यांनाच दिल्लीत बोलावून घ्यायचे का ?

अशोकचक्र पुरस्कार दिला जातो तो शौर्यासाठी. आज या तरूणीला हा पुरस्कार दिला भविष्यात प्रत्येक बलात्कारित पिडीत तरूणीला असा पुरस्कार द्यावा लागेल. आणि मग विविध प्रसंगी आणि युद्धामध्ये शौर्य गाजवून याच पुरस्काराने सन्मानित करण्यात व्यक्तींना अशोकचक्र हा पुरस्कार स्वीकारताना काय वाटेल ?

दिल्लीतील बलात्काराच्या घटनेतील पिडीत तरुणी विषयी मला पूर्ण सहानभूती आहे पण. तिला पुरस्कार देण्यामुळे तिचा सन्मान सन्मान तर होणार नाहीच झालाच तर अपमानच होईल. त्यामुळेच भविष्यात सदर घटनेत पिडीत तरुणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि दोषींना फाशीची शिक्षा हीना त्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करणं आणि या नव्या कायद्याची सहा महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणे यातूनच त्या पिडीत तरुणीचा सन्मान होईल आणि ब्ल्त्काराच्या घटनांवर पायबंद येईल.

त्यामुळेच शशी थरूर असो कि  विजेंदर गुप्ता असो यांनी अशी काही विधान करण्यापेक्षा  कठोर कायद्याच्या अंमलबजावणी पाठपुरावा करणा हेच महत्वाचं.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s