आभाळाचं डोळं, तिच्याकडं लागलं

ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं…..

हे कधी….कुठे……आणि कसं घडत असेल असं तुम्हाला वाटतं. शहरातल्या रहदारीने गजबजलेल्या रस्त्यावर सिग्नला उभा असताना घडता का हे ? मुळीच नाही. असं घडायला हवं असतं निसर्गाचं सानिध्य. हवं असतं हिरवं हिरवं रान……..खळाळणारे ओढे……….पाखरांची किलबिल………पावसाची रिमझिम………ऊन सावलीचा खेळ.

तुम्ही म्हणाल, ” हे असं तर आमच्या क्लासरूम मध्येही घडत असतं……कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये असेच डोळ्यांना डोळे भिडतात. असं घडायला निसर्गाचा सहवास लागतोच असं काही नाही.”

असं नाही मित्रांनो. असं घडायला निसर्गाचा सहवास हवाच असतो. तुम्ही म्हणताय तसं तुमच्या बाबतीत तुमच्या क्लासरूम मध्ये किंवा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये असं घडलं असेल तर आठवून पहा त्या क्षणी तुम्हाला फक्त ती दिसत असते. क्लासरूमच्या भिंतींना……क्लासमधल्या इतर मित्र मैत्रिणींना, कॉलेजच्या कॅन्टीन मधल्या गोंगाटाला तेव्हा अस्तित्वच उरलेलं नसतं.

निसर्गाच्या सहवासात मात्र तसं घडत नाही. निसर्गाचा अस्तित्व पुसला जात नाही. निसर्गाच्या सानिध्यात तो आभाळ होऊन तिला पहात असतो. रानातला गवत होऊन तिच्या पायांना वेढत असतो. ओढ्याच्या पाण्याचं गाणं होऊन तिला भरून टाकत असतो. बाभळीचा कट होऊन तिच्या पदराला हात घालत असतो. पण हे काटे असतात तिच्या अंगावर शहारे आणणारे तिला मोहरून टाकणारे.zadachya panatun

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s