पाण्याचं राजकारण

kukadi damपाणी. वनस्पतीपासून प्रत्येक सजीवाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली एक बाब.  देशात अनेक धरणं. कालवे. सिंचनाची एक सुसूत्र व्यवस्था. पण आज आमच्या राजकर्त्यांच्या हातात सापडलेली. परवा एका ग्रामपंचाइतीच्या निवडणुकीदरम्यान आपलंच ( राष्ट्रवादीच ) सरकार सत्तेत असल्याची आणि सगळ्या चाव्या आपल्याच नेत्याच्या हाती असल्याची जाणीव असणाऱ्या एका उमेदवाराने, ” माझं प्यानल पडलं तर तुम्हाला पाण्यावाचून मारीण.” अशी सरळ सरळ धमकीच मतदारांना दिली. आणि दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघालेल्या मतदारांनी त्या प्यानल गळ्यात विजयाची माळ घातली.

सत्ताधाऱ्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मजल इथपर्यंत गेली आहे.

छोटे मासेच इतकी मनमानी करतात मग मोठे मासे काय करत असतील ? आदिवासी विकास मंत्री आणि पालक मंत्री अशी दोन खाती पदरी असलेल्या बबनराव पाचपुतेंनी सुद्धा त्यांच्याच तालुक्यातील मतदारांना वेठीला धरलं. पहिल्यांदा कुकडीच पाणी सुटलं पण श्रीगोंद्यातील काही भागाला एक थेंबही पाणी मिळालं नाही. ज्वारीची पिक पाण्याअभावी जळून गेली पण ज्वारीला पाणी मिळालं नाही. पालकमंत्री असणाऱ्या बबनराव पाचपुतेंनी असं का केलं असेल ? कारण सोपं आहे ज्या भागातून त्यांच्या पक्षाच्या विरोधात मतदान झालं होतं त्या भागाला दुष्काळाच्या झळांनी भाजून काढायचं त्यांनी ठरवला होतं.

कुकडीला पुन्हा पाणी सुटलं पण आम्हाला पाणी नाही. शेवटी कुकडीच पाणी विसापूरच्या तलावात सोडून ते आम्हाला द्यावं म्हणून आम्ही विसापूर तलावावर आंदोलन केलं. आमच्या समजुतीसाठी विसापूर तलावात पाणी सोडण्यात आलं पण आंदोलनकर्ते दूर जाताच तलावात पडणारा पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला. कारण आंदोलनकर्त्यांनी बबनरावाचे पाय न धरता नहाटा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. आणि हे बबनरावांना रुचलं नव्हतं.

आणि तिकडे कर्जतचे विरोधी पक्षात असणारे भाजपचे आमदार राम शिंदे आत्मदहनाचा इशारा देतात आणि कुकडीचा अवघा लोंढा त्यांच्या तालुक्यात नेतात. पंचेचाळीस दिवसांसाठी सुटलेला कुकडीच रोटेशन सव्वादोन महिन्यापर्यंत लांबवतात. याला म्हणतात जनतेचे नेते.

अखेरीस कुकडीला पाणी सुटून दीड महिना उलटल्यावर आमच्या नशिबी आलं. ज्वाऱ्या सुकून गेल्या होत्या तरी आम्ही ज्वारयांना पाणी दिलं. सुकलेल्या ज्वारीसाठी पाणीपट्टी दिली. यंदाच्या पावसाळ्यात ओढ्याला पाणी आलंच नव्हतं. गुराढोरांना, पिला पाखरांना गेल्या सहा महिन्यात प्यायला पुरेसं पाणी मिळालं नव्हतं. म्हणून ओढ्याला पाणी सोडव अशी विनंती आम्ही तहसीलदारांना केली तर त्यांनी वीसहजार रुपयांची मागणी केली.आण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला बगलेत घेऊनkukadi dam आम्ही ते पैसे दिले. मोजून आठ दिवस ओढ्याला पाणी सोडण्यात आलं. 

कसं होणार आमचं ? 

मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाण्याची हि वृत्ती कधी लोप पावणार ? सामान्य जनता दुष्काळात होरपळून निघत असताना स्वतःच्या तुंबड्या भरताना या अधिकाऱ्यांना लाज कशा वाटत नाहीत ? पाटबंधारे खात्यात हजारो कोटींचा घोटाळा होतो. अजित पवार राजीनामा देतात. वातावरण निवळल कि पुन्हा मंत्री मंडळात येतात. सरकारी अधिकारीही या साऱ्याला सरवले आहेत. पण जागं व्हायला हवं. या व्यवस्थ्येच्या विरोधात युद्ध पुकारायला हवं

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s