गोड बोल गाढवा

tilgulकाल खूप दिवसांनी गावाहून आलो. पाणी आहे. शेतीत रमलोय. कष्ट करतोय. कष्ट कंपनीत असतानाही करत होतो. त्याबदल्यात मिळावा तेवढा मोबदला मिळत नव्हता. आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेची आणि कामचुकार मंडळी केवळ लाळघोटेपनाच्या, हुजरेगीरीच्या जोरावर आपल्यापेक्षा अधिक पगार घेतात हे पाहून व्यथित व्हायचो.

शेतात मेथी केली होती. परिसरात माझ्या मेथीची ख्याती पसरली होती. तीन चार किलोमीटरहून काही मंडळी आली माझा प्लॉट पाहून खुश झाली. बाजारही बरा मिळाला. काही हजार रुपये पदरात पडले. फायदा किती झाला यापेक्षाही आज एका कुटुंबाचा मी पूर्णवेळ पोशिंदा आहे याचं मला समाधान आहे. याव्यतिरिक्तअधूनमधून बारा चौदा गडी बाया माझ्या शेतावर काम करत असतात. त्यांच्याही मीठ मिरचीची सोय माझ्यामुळे होत असते. मेथीचा प्लॉट संपलाय. आता पुढचं नियोजन चालू आहे.

काल आलो. आज ब्लॉग उघडला. माझ्या ब्लॉगच प्रगतिपुस्तक (stats ) पहिल. आज मकरसंक्रात माझ्या शुभेछा मिळतील काही नव्या ओळी मिळतील, संक्रतीसाठी एखादं भेटकार्ड मिळेल या अपेक्षेने आज अनेकांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली पण त्यांच्या नशिबी निराशाच पडली असेल. कारण मी आज अजून काहीच पोस्ट केलं नव्हतं. त्यामुळेच ‘ तिळगुळ ‘ हि मागच्या संक्रातीला टाकलेली कविताच अनेकांनी आज पुन्हा पहिली. म्हणून आज तुम्हाला मकरसंक्रातीच्या मनःपूर्वक शुभेछा देतानाच देतोय एक खोडकर भेटकार्ड. आवडलं कि नाही ते नक्की सांगा.      tilgul

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s